वॉशिंग्टन डीसीNASA astronaut Sunita Williams :नासाच्या अंतराळवीर सुनीता सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बुच आज पृथ्वीवर फोन करून संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून त्या पत्रकार परिषदेत सहभागी होतील, यूएस स्पेस एजन्सीनं म्हणटलंय. स्पेस कॉल 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2:15 वाजता शेड्यूल केला आहे. ह्यूस्टनमधील NASA च्या जॉन्सन स्पेस सेंटरमधून या जोडीनं 5 जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानात प्रथम क्रू फ्लाइटसाठी झेप घेतली होती. ते 6 जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचलं होतं.
इथं पहा लाइव्ह : माहिती देताना NASA नं सांगितलं, की या कार्यक्रमाचं कव्हरेज NASA+, NASA ॲप आणि एजन्सीच्या वेबसाइटवर प्रसारित केलं जाईल. सोशल मीडियासह विविध प्लॅटफॉर्मवर NASA याचं कव्हरेज करणार आहे.
स्टारलाइनर परतल्यानंतर प्रथमच संवाद :स्टारलाइनरच्या पुनरागमनानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा अनुभव सांगण्याची ही पहिलीच वेळ असेल. दोन्ही अंतराळवीर मिशनची नियोजित वेळ वाढवण्याशी संबंधित आव्हानं आणि संधींबद्दल बोलतील, अशी अपेक्षा आहे. 13 सप्टेंबर रोजी, दोन्ही अंतराळवीर पृथ्वी टू स्पेस कॉलद्वारे न्यूज कॉन्फरन्समध्ये सामील होतील. तसंच त्यांचे अनुभव शेअर करतील. यासोबतच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आयएसएस, ऑर्बिट लॅबोरेटरी आणि तिथल्या जीवनाबाबत सुरू असलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी त्यांचे अनुभव सांगतील.