हैदराबादJob Cut In Meta : फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कारण मेटानं सोमवारी सकाळी प्लॅटफॉर्मवरील शेकडो कर्मचाऱ्यांसाठी वाईट दिली. आज पहाटे 5 वाजल्यापासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना जारी झाल्या आहेत. वाईट कामगिरी करण्याच्या नावाखाली कंपनी कर्मचाऱ्यांना काढणार आहे. यात सर्वात कमी कामगिरी करणारे जवळपास 5% कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
Meta layoffs:फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा सोमवारी सकाळी प्लॅटफॉर्मवरील शेकडो कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी घेऊन आली. मार्क झुकरबर्गची कंपनी सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 5 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना जारी करत आहे. मात्र, यावेळी मेटाचं कार्यालय बंद राहणार नाही. याबाबत कंपनी कोणतेही निवेदन जारी करणार नाही. ही कपात जागतिक स्तरावर केली जाईल, परंतु जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँडमधील कर्मचाऱ्यांना स्थानिक नियमांमुळं याचा फटका बसणार नाहीय. 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील डझनभर देशांमधील कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जातील. मेटाच्या हेड ऑफ पीपल जेनेल गेल यांनी लिहिलेल्या पोस्टनुसार, बहुतेक देशांमध्ये सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 5 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडं कंपनी मेटा मशीन लर्निंग अभियंते आणि इतर प्रमुख पदासाठी भरती करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असं बिझनेस टुडेनं म्हटलं आहे.