हैदराबाद :दक्षिण कोरियाची ऑटोमेकर कंपनी Kia नं भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम SUV कार ऑफर केल्या आहेत. कंपनी लवकरच Kia Syros ला नवीन SUV म्हणून आणण्याच्या तयारीत आहे. लॉंच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नव्या एसयूव्हीचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. नवीन टीझरमध्ये कोणती माहिती समोर आली आहे?, कार कधी लॉंच होईल? जाणून घेऊया बातमीतून...
नवीन टीझर रिलीज :Kia लवकरच Kia Syros ही नवीन SUV भारतात आणणार आहे. लॉंचपूर्वी कंपनीनं या एसयूव्हीचा नवीन टीझर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या टीझरमध्ये एसयूव्हीच्या अनेक फीचर्सची माहिती दिली जात आहे.
काय माहिती मिळाली : रिलीज झालेल्या नवीन टीझरमध्ये या SUV च्या काही फीचर्सची माहिती समोर आली आहे. Kia Syros SUV मध्ये पॅनोरामिक सनरूफ, LED लाइट्स, LED DRL, आणि रूफ रेल तसेच ADAS सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जातील. तथापि, अशी वैशिष्ट्ये फक्त त्याच्या उच्च प्रकारांमध्ये दिली जाऊ शकतात. कंपनीकडून बेस व्हेरियंटमध्ये कमी फीचर्स दिले जातील.
फ्रंट लुकची झलक :कंपनीनं जारी केलेल्या नवीन टीझरपूर्वी आणखी एक टीझर आणि स्केच रिलीज करण्यात आला आहे. नवीन 50-सेकंदाच्या टीझरमध्ये वाहनाचं नाव आणि फ्रंट लुकची झलक दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन एसयूव्ही अतिशय भविष्यकालीन डिझाइनसह लॉंच केली जाईल. ही SUV खास Kia ने आधुनिक डिझाइन, उत्तम तंत्रज्ञान आणि अधिक जागा असलेली SUV म्हणून तयार केली आहे.