हैदराबाद :किआ इंडिया भारतीय बाजारात त्यांची नवीनतम एसयूव्ही Kia Syros SUV आज लॉंच करणार आहे. Kia Syros SUV पूर्णपणे नवीन डिझाइनसह येईल. एकदा लाँच झाल्यानंतर, ही SUV विक्रीसाठी उपलब्ध होईल. Kia कंपनीची ही पाचवी एसयूव्ही असेल.
Kia Syros Design : किआ सायरोस नवीन डिझाइनसह देशात दाखल होणार आहे. ही पूर्णपणे नवीन फ्रंट फॅसियाच्या स्वरूपात दिसून येईल, ज्यामध्ये उभ्या स्टॅक केलेले हेडलॅम्प आणि डीआरएलसह जाड बंपर असेल. कंपनीन यात EV9मध्ये दिलेले वैशिष्ट्ये दिसण्याची शक्यता आहे. कारला नवीन अलॉय व्हील्स देखील मिळणार आहेत. तसंच कारच्या मागील बाजू एल-आकाराच्या एलईडी टेल लाइट्स असतील.
Kia Syros Feature :Kia Syros मध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअप सर्वात जास्त लक्ष वेधून घेईल. ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे. त्यात प्रकाशित लोगोसह एक नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील देखील असेल. वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, अॅम्बियंट लाइटिंग आणि बरेच काही समाविष्ट असू शकतं. सुरक्षिततेसाठी, ब्रँड कदाचित 360-डिग्री कॅमेरा, एअरबॅग्ज आणि ADAS वैशिष्ट्य यात देण्याची शक्यता आहे.