हैदराबाद : भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये किआ सायरोस पहिल्यांदाच लोकांसमोर प्रदर्शित झाल्यानंतर ती अखेर भारतात विक्रीसाठी उपलब्ध झालीय. किआची ज्याची किंमत ९ लाख ते १७.८० लाख रुपये ( एक्स-शोरूम) आहे . सायरोससाठी बुकिंग आधीच सुरू झाली होती, तर या कारची डिलिव्हरी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. सहा विस्तृत प्रकारांमध्ये टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह ती ऑफर करण्यात आली आहे. किआ सायरोसबद्दल जाणून घेऊया सर्व माहिती...
किया सायरोस डिझाइन
किया सायरोसची डिझाइन किआ इलेक्ट्रिक एसयूव्ही, EV९ सारखी आहे, ज्यामध्ये मस्क्युलर स्टॅन्स आणि आधुनिक स्टाइलिंगचा वापर करण्यात आला आहे. तिचे फ्रंट प्रोफाइल स्लीक एलईडी डीआरएल आणि उभ्या स्टॅक केलेल्या ३-पॉड एलईडी हेडलाइट्सद्वारे हायलाइट केलं आहे. सायरोसमध्ये बॉक्सी साइड प्रोफाइल आहे. ही कारला १७-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर जाड बॉडी क्लॅडिंग आणि स्क्वेअर-ऑफ व्हील आर्चमुळं तिचा बांधा अधिक मजबूत झाला आहे. मागील बाजूस, त्यात एल-आकाराचे एलईडी लाईट्स आहेत, तर छतावर स्पॉयलर स्पोर्टी टच यात मिळतोय.
किया सायरोस इंटीरियर
सायरोसमध्ये लेदरेट सीट अपहोल्स्ट्रीसह एक अपमार्केट केबिन लेआउट, विविध प्रकारांमध्ये बदलणारी ड्युअल-टोन थीम आणि २-स्पोक स्टीअरिंग व्हील आहे.
किया सायरोस वैशिष्ट्ये
किया सायरोस वायरलेस अॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटोसह १२.३-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, १२.३-इंच डिजिटल ड्रायव्हर्स डिस्प्ले आणि ५-इंच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल स्क्रीन अशा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. किआनं त्यात ८-स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम, पुढील आणि मागील प्रवाशांसाठी सीट व्हेंटिलेशन, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर आणि ६४-रंगी ॲम्बियंट लाइटिंग देखील दिले आहेत. सुरक्षेच्या बाबतीत, यात सहा एअरबॅग्ज (मानक म्हणून), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, ३६० -डिग्री कॅमेरा, फ्रंट, साइड आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि लेव्हल-२ADAS (प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) आहेत.