महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

प्रजासत्ताक दिनी जिओ लॉंच करणार JioSoundPay service, व्यापाऱ्यांची होणार 1,500 रुपयांची बचत - JIOSOUNDPAY SERVICE

प्रजासत्ताक दिनाला Jio कंपनी JioSoundPay service हे मोफत फीचर लॉंच करणार आहे. या फीचरचा फायदा लहान व्यापाऱ्यांना UPI पेमेंटसाठी होणार आहे.

JioSoundPay service
जिओ साऊंडपे सर्विस (Jio)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 25, 2025, 3:07 PM IST

मुंबई :प्रजासत्ताक दिनी जिओ जिओसाऊंडपे सेवा सुरू करणार आहे. हे फीचर जिओभारत फोनवर आयुष्यभरासाठी मोफत उपलब्ध असेल. खरं तर, JioSoundPay तुम्हाला कोणत्याही साउंड बॉक्सशिवाय UPI पेमेंट अलर्ट प्राप्त करण्याची परवानगी देईल. भारतातील कोणत्याही मोबाईल फोनवर उपलब्ध असलेली ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा आहे. देशातील 5 कोटींहून अधिक लघु उद्योजक आणि व्यावसायिकांना याचा थेट फायदा होईल.

1,500 रुपयाची करा बचत
कंपनीच्या मते, JioSoundPay ही एक अभूतपूर्व नवोपक्रम आहे. जो प्रत्येक UPI पेमेंटसाठी त्वरित आणि बहुभाषिक ऑडिओ अलर्ट संदेश देईल. यामुळं अगदी लहान किराणा दुकानं, भाजीपाला विक्रेते, रस्त्याच्या कडेला असलेल्या अन्न विक्रेत्यांनाही व्यवसाय करणं सोपं होईल. सध्याचे छोटे-मोठे व्यापारी साउंड बॉक्ससाठी दरमहा सुमारे 125 रुपये देतात. आता ही सेवा JioSoundPay वर मोफत उपलब्ध असल्यानं, JioBharat फोन वापरकर्ते दरवर्षी 1,500 रुपयांपर्यंत बचत करू शकतील.

जगातील सर्वात परवडणारा 4G फोन
JioBharat फोन सुमारे एक वर्षापूर्वी लाँच झाला होता. तो जगातील सर्वात परवडणारा 4G फोन मानला जातो, ज्याची किंमत फक्त 699 रुपये आहे. अशा प्रकारे, कोणताही व्यापारी नवीन JioBharat फोन खरेदी करू शकतो आणि फक्त 6 महिन्यांत फोनची संपूर्ण किंमत वसूल करू शकतो. भारताच्या प्रजासत्ताकाची 75 वर्षे साजरी करण्यासाठी, जिओनं जिओसाउंडपे वर आधुनिक संगीतासह वंदे मातरमची धून देखील सादर केलीय. जिओचे अध्यक्ष सुनील दत्त म्हणाले, 'जिओभारतवरील मोफत जिओसाऊंडपे फीचर आणि वंदे मातरमच्या भावपूर्ण सादरीकरणासह, आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. खऱ्या डिजिटल भारताच्या उभारणीसाठी आमचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.”

हे वाचलंत का :

  1. Google चं Identity Check feature लाँच, जाणून घ्या कसं करतं काम?
  2. 'दुष्काळात तेरावा महिना' : सीएनजी टॅक्सी, ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ, वाचा काय आहेत नविन दर?
  3. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिलं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रलय प्रदर्शित होणार

ABOUT THE AUTHOR

...view details