मुंबई iPhone 16 Sale :मोबाईल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बहुचर्चित अॅपलची 16 सिरीज लॉन्च झाली आहे. अॅपल 16 हा आय फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळं हा फोन विकत घेण्यासाठी मुंबई आणि दिल्लीत ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. परराज्यातून हा फोन विकत घेण्यासाठी दिल्लीसह मुंबईत लोकं दाखल झाली आहेत. अॅपल 16 हा फोन नेमका कसा असेल? त्याचे फीचर्स काय असतील? कॅमेरा, मेमरी, किंमत काय असेल? पण या सर्व प्रश्नांची उत्तर आता मोबाईलच्या रूपानं समोर आली असून, हा फोन विकत घेण्यासाठी लोकांचा मोठा मुंबईसह दिल्लीत प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर मिमम्सचा पाऊस :आयफोनविकत घेण्यासाठी नागरिकांची देशभरात विविध ठिकाणी गर्दी पाहायला मिळत मिळत आहे. दुसरीकडं ॲपल 11 आणि 12 प्रमाणेच हा फोन असल्याचं बोलत जात आहे. याबाबत सोशल मीडियावर मीन्सचा पाऊस पडत आहे. ॲपल 16 मध्ये नवीन काही नाही, कॅमेरा ॲपल 11 आणि 12 प्रमाणेच असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, असं असतानाही लोकांनी फोन खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.
माणूस तोच कपडे मात्र नवे :ॲपल 16 येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. हा फोन कधी येणार? आणि फोन कसा असणार? याबाबत उत्सुकता होती. मात्र हा फोन आल्यानंतर समाज माध्यमांवर लोकांनी नाराजी व्यक्त केलीय. "ॲपल 16 हा फोन जुन्या स्वरूपातच आहे. फोनचा कॅमेरा, स्क्रीनची क्षमता, आदी फिचर्स ॲपल 11 आणि 12 सारखेच आहेत. माणूस तोच, मात्र कपडे नवीन आहे, असं सायबर तज्ञ अंकुर पुराणिक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलं आहे". त्यामुळं मोबाईलमध्ये नवीन काहीही पाहायला मिळत नाही. नवीन कुठलीही गोष्ट नसल्याची प्रतिक्रिया अंकुर पुराणिक दिली आहे.