हैदराबाद :भारतीय नौदलानं नुकत्याच समाविष्ट केलेल्या INS अरिघात या पाणबुडीवरून 3,500 किमीच्या बॅलिस्टिक K-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलीय. या चाचणीमुळं भारताची ताकद आणखी वाढणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नौदल आता भविष्यात आणखी अनेक क्षेपणास्त्र प्रणालींची चाचणी घेणार आहे.
3500 किमीचं लक्ष भेदण्याची क्षमता :नौदलानं बुधवारी K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अरिघाट या आण्विक पाणबुडीवरून ही चाचणी करण्यात आली. 2017 मध्ये अरिघाट लाँच करण्यात आली होती. त्याची अपग्रेड केलेली आवृत्ती लवकरच कार्यान्वित होणार आहे. अरिघाट ही आयएनएस अरिहंतची अपग्रेडेड आवृत्ती आहे. हे विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी केंद्रात (SBC) बांधली गेली आहे. अरिहंतच्या तुलनेत अरिघाट हे के-4 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असेल ज्यात 3500 किमीचं लक्ष भेदण्याची क्षमता आहे. या पाणबुडीचं वजन 6 हजार टन आहे.
दोन आण्विक पाणबुड्या :भारतीय नौदलाकडं INS अरिहंत आणि अरिघात आहेत भारतीय नौदलाच्या शस्त्रागारात दोन आण्विक पाणबुड्या आहेत, ज्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता आहे. आरिघाटला ऑगस्टमध्ये विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. अशा प्रकारची ही तिसरी पाणबुडी आहे. ती पुढील वर्षी सामील होण्याची अपेक्षा आहे.