ETV Bharat / technology

Apple एप्रिलमध्ये Siri अपग्रेडसह iOS 18.4 लाँच करणार? - APPLE IOS 18

ॲपलचं iOS 18.4 अपडेट एप्रिलमध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. सध्या, Apple Intelligence भारतात पूर्णपणे उपलब्ध नाही. येणाऱ्या iOS 18.4 अपडेटमध्ये नवीन वैशिष्ट्ये येतील.

Apple iOS 18.4
Apple iOS 18.4 (Apple iOS 18.4)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 29, 2025, 1:09 PM IST

हैदराबाद : गेल्या वर्षी ॲपलनं त्यांच्या नवीनतम आयफोन 16 लाइनअपसह ॲपल इंटेलिजेंस फीचर्सची घोषणा केलीय, ज्याचा फायदा निवडक उपकरणांना होणार आहे. आता भारतात iOS 18.4 चं रोलआउट एप्रिलमध्ये होऊ शकतो. या अपडेटमुळं आयफोन वापरकर्त्यांना विशेष वैशिष्ट्यांचा फायदा मिळेल. नवीन अपडेटनंतर, सिरीला अधिक चांगल्या कमांड देता येतील.

भारतीय वापरकर्त्यांना त्यांची भाषा यूएस इंग्रजी किंवा कॅनेडियन इंग्रजीमध्ये सेट करून ॲपल इंटेलिजन्सचा फायदा मिळत आहे. याशिवाय, सध्या फक्त ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूकेमध्ये राहणाऱ्या वापरकर्त्यांनाच अॅपल इंटेलिजेंसवर प्रवेश दिला जातोय. ही वैशिष्ट्ये एप्रिल महिन्यात भारतात आणली जाऊ शकतात. कंपनीनं स्वतः याबाबत पुष्टी दिली आहे. नवीन अपडेटमध्ये उपलब्ध असलेल्या ५ वैशिष्ट्यांबद्दल आज आपण जाणून घेऊया...

एआय-चालित सिरी
अपडेटनंतर, वापरकर्त्यांना सिरीमध्ये सर्वात मोठा बदल दिसून येईल. व्हर्च्युअल असिस्टंट पूर्वीपेक्षा अधिक कामं फक्त बोलून करता येतील. वापरकर्त्यांना सिरीशी संबंधित सूचना देखील दिल्या जातील.

व्हॉइस असिस्टंट
व्हॉइस असिस्टंट आता तुमच्या गोष्टी लक्षात ठेवेल आणि मागील गोष्टींवर आधारित नवीन सूचना देईल. याचा अर्थ असा की तुम्ही सिरीला स्वतःबद्दल विचारू शकता आणि तुम्हाला ईमेलपासून पासपोर्ट क्रमांकापर्यंत सर्व माहिती दिली जाईल. तुम्ही एकमेकांशी संबंधित अनेक प्रश्न सतत विचारू शकता. जसे की, 'हे सिरी, मुंबईतील हवामान कसं आहे?' यानंतर 'वाहतूक कशी आहे?' विचारल्यानंतर, तुम्हाला मुंबईतील नवीनतम वाहतूक स्थिती सांगितली जाईल.

ऑन-स्क्रीन जागरूकता
अ‍ॅपल इंटेलिजेंससह, तुम्हाला स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेंटशी संवाद साधण्याचा पर्याय मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एखाद्याचे संपर्क कार्ड दिसले, तर तुम्ही Siri ला संपर्क कार्ड तुमच्या अॅड्रेस बुकमध्ये सेव्ह करण्याची आज्ञा देऊ शकता. त्याचप्रमाणे, कोणत्याही नंबरवर कॉल करता येतो.

अखंड संवाद साधण्याचा पर्याय
वापरकर्त्यांना सिरीसह वेगवेगळ्या ॲप्सवर अखंड संवाद साधण्याचा पर्याय मिळणार आहे. यानंतर, वापरकर्त्यांना कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ॲप्सवर जावं लागणार नाही. ईमेल पाठवणं आणि फोटो संपादित करणं यासारखी कामे देखील सिरीशी बोलून करता येतील. उदाहरणार्थ, पूर्वी ड्राफ्ट केलेला ईमेल पाठवण्यासाठी, तुम्हाला म्हणावं लागेल, 'हे सिरी, मी गेल्या महिन्यात ड्राफ्ट केलेला ईमेल पाठवा.'

नवीन इमोजी
प्रत्येक मोठ्या अपडेटप्रमाणे, ॲपल नवीनतम अपडेटमध्ये नवीन इमोजी देखील समाविष्ट करेल. युनिकोड कॉन्ट्रिअमनं वापरकर्त्यांना कोणतं इमोजी मिळणार आहेत, याची माहिती आधीच दिली आहे. यामध्ये फिंगरप्रिंट, डोळ्यांखाली काळी वर्तुळे असलेला चेहरा, मुळांच्या भाज्या आणि फावडे यांसारखे इमोजींचा समावेश आहे.

हे वाचलंत का :

  1. इन्फिनिक्स स्मार्ट 9 एचडी भारतात 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच, वाचा स्पेसिफिकेशन्स
  2. इस्रोनं पुन्हा रचला इतिहास, GSLV-F15/NVS 02 नेव्हिगेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
  3. nothing phone 3a फोन 'या' तारखेला होणार लॉंच?, अधिकृत वेबसाइटवर पेज झालं लाइव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.