महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

पेट्रोलपासून सुटका! देशातील पहिली 300 cc Flex Fuel बाईक लॉंच

Honda CB300F Flex Fuel Bike : Honda Motorcycle नं नवीन CB300F फ्लेक्स इंधन बाइक लॉंच केली. ही भारतातील पहिली 300 cc फ्लेक्स इंधन मोटरसायकल आहे.

Honda CB300F Flex Fuel Bike
होंडा CB300F फ्लेक्स इंधन बाइक (Honda)

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 21, 2024, 4:22 PM IST

Updated : Oct 21, 2024, 4:37 PM IST

हैदराबाद : Honda CB300F Flex Fuel Bike : होंडा मोटरसायकलनं आपली नवीन Honda CB300F Flex Fuelमोटारसायकल भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. ही बाईक फ्लेक्स-इंधनावर चालणार आहे. कंपनीनं या दुचाकीची किंमत 1.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. विशेष बाब म्हणजे तिची किंमत तिच्या स्टँडर्ड मोटरसायकलसारखीच आहे. खरेदीदार आता Honda च्या Bigwing डीलरशिपवर 2024 Honda CB300F फ्लेक्स इंधन बुक करू शकतात.

होंडा CB300F फ्लेक्स इंधन बाइक (Honda)

नवीन Honda CB300F : कंपनीनं भारत मोबिलिटी शोमध्ये प्रथमच ही फ्लेक्स इंधन बाइक सादर केली होती. ही बाईक E85 इंधनावर चालेल. म्हणजेच त्यात वापरण्यात येणारं इंधन 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल असेल. फ्लेक्स फ्यूल इंजिन व्यतिरिक्त कंपनीनं या बाइकमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या बाईकचा लुक, डिझाइन, हार्डवेअर पूर्वीप्रमाणेच आहे.

दोन रंगात उपलब्ध : ही मोटरसायकल दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स रेड आणि मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक कलरचा समावेश आहे. ही बाईक मोठ्या प्रमाणात स्टँडर्ड मॉडेलसारखीच आहे. एलईडी हेडलाइट्स आणि मस्क्युलर बॉडी वर्क यात पाहायला मिळतयं. तिचा फ्रंट अधिक शार्प करण्यात आल्यामुळं तिला स्पोर्टी लुक मिळतोय.

इंजिन :कंपनीनं या बाइकमध्ये 293.5 सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर ऑइल कूल्ड इंजिन वापरलं आहे. जे 24.5bhp पॉवर आणि 25.9Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. या बाईकमध्ये LED इल्युमिनेशनसह पूर्वीप्रमाणेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. हार्डवेअरबद्दल बोलायचं झाले तर, कंपनीने CB300F मध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये दिली आहे. त्याच्या समोर एक सोनेरी रंगाचं अप-साइड-डाउन (USD) फोर्क सस्पेंशन आहे. मोनोशॉक सस्पेन्शन मागील बाजूस उपलब्ध आहे.

दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक :या बाइकला ब्रेकिंगसाठी, दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक बसवण्यात आले आहेत. जे ड्युअल चॅनल एबीएसनं सुसज्ज आहेत. जर आपण पॉवरट्रेन बघितलं तर त्याला 293.53cc, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळतं, जे आता E85 इंधनाशी सुसंगत आहे. याचा अर्थ ते इथेनॉल-गॅसोलीन मिश्रणावर 85 टक्के इथेनॉलसह चालू शकतं.

हे वाचलंत का :

  1. अमरावतीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी! पल्सर बाईकच्या इंजिनपासून तयार केली 'गो कार्ट', किती आला खर्च?
  2. इलेक्ट्रॉन गतिशीलता मर्यादित करणारी यंत्रणा संशोधकांनी काढली शोधून
  3. ब्लॅक थीमसह Mahindra Scorpio Classic Boss Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर
Last Updated : Oct 21, 2024, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details