हैदराबाद : भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांनी चीनच्या एआय मॉडेल डीपसीकवर बंदी घातली आहे. डीपसीकवर बंदी घालणाऱ्या देशांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत या एआय मॉडेलवर बंदी घातली आहे. या देशांचं म्हणणं आहे की, या मॉडेलच्या डेटा स्टोरेजबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही, ज्यामुळं वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात येऊ शकतो.
सुरक्षेमुळं डीपसीकवर बंदी
चिनी एआय चॅटबॉट डीपसीक लाँच झाल्यापासूनच चर्चेत आहे. लाँच होताच जगभरात यामुळं खूप गोंधळ उडाला होता. आता अनेक देशानं त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. डीपसीकवर बंदी घालणाऱ्यांमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, भारत आणि इतर देशांचा समावेश आहे. या देशांनी सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेशी संबंधित सुरक्षेमुळं डीपसीकर बंदी घालत असल्याचं म्हटलंय. डीपसीकवर वापरकर्त्यांचा संवेदनशील डेटा साठवून ठेवल्याचा संशय आहे. यामुळं कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. यासोबतच, कंपनीनं डेटा स्टोरेजबाबतचं धोरण स्पष्ट केलेलं नाही, असा आरोप डीपकवर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचं सायबर सुरक्षा दूत अँड्र्यू चार्लटन यांनी डीपसीकवर बंदी घालताना म्हटलं की, सरकारी यंत्रणा या अॅप्सच्या संपर्कात येऊ इच्छित नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यावर बंदी घातली जात आहे. त्याच वेळी, भारतानं कठोर भूमिका घेतली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या सर्व एआय टूल्सचा वापर करण्यास बंदी घातली आहे.
डीपसीकवर कोणत्या देशांनी बंदी घातली?
भारत
भारतात अर्थ मंत्रालयानं कर्मचाऱ्यांना अधिकृत आयडी आणि डिव्हाइसेसवरून डीपसीक आणि इतर एआय टूल्स वापरू नयेत, असे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाचं म्हणणे आहे की या टूल्समधून संवेदनशील सरकारी डेटा लीक होऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियानं त्यांच्या देशातील सरकारी डिव्हाइसेसवर डीपसीक एआय वापरू नये, असे निर्देश देखील दिले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा एजन्सीचे म्हणणे आहे की हे एआय टूल सुरक्षेवर परिणाम करू शकते.
अमेरिका
अमेरिकानं नौदलानं देखील डीपसीकचा अधिकृत आणि वैयक्तिक वापर करण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेत, टेक्सास हे पहिले एआय ॲप होतं, ज्यावर बंदी घालण्यात आली.