हैदराबाद Huawei Mate 70 Series :Huawei नं अखेरीस त्यांच्या फ्लॅगशिप Mate 70 सिरीज स्मार्टफोन्सची लॉंचची तारीख उघड केली आहे. Huawei च्या कंझ्युमर बिझनेस ग्रुपचे (CBG) CEO रिचर्ड यू यांनी 2024 ग्वांगझो ऑटो शोमध्ये नवीन मालिका 26 नोव्हेंबर 2024 रोजी लाँच करणार असल्याची घोषणा केलीय. मात्र, Huawei च्या अधिकृत वेबसाईट, सोशल मीडिया याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाहीय.
Huawei Mate 70 मालिकेत चार स्मार्टफोन :या मालिकेत किमान चार स्मार्टफोन समाविष्ट असतील - Huawei Mate 70, Huawei Mate 70 Pro, Huawei, Mate 70 Pro + आणि Huawei Mate 70 RS Ultimate.
संभाव्य तपशील : Mate 70 मालिकेत नवीन HiSilicon Kirin 9100 चिप असण्याची अपेक्षा आहे. ही SMIC नं 6nm प्रोसेस नोडवर बनवली आहे आणि त्याची कार्यक्षमता Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 च्या बरोबरीची असल्याचं मानलं जातं. Huawei चे सिग्नेचर वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल या मालिकेत दिसेल. मॉड्यूलमध्ये चार कॅमेरा सेन्सर असतील, जे चौरस स्वरूपात सेट केले जातील. हे मॉड्यूल गोलाकार किंवा अंडाकृती आकारासह एक अद्वितीय डिझाइन देऊ शकते. Mate 70 मालिका Huawei च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम HarmonyOS Next वर चालेल. ही प्रणाली अँड्रॉइड ओपन सोर्स प्रोजेक्ट (AOSP) वर आधारित नसेल. या लाइनअपमध्ये 6,000mAh बॅटरी मिळेल, जी 88W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. Mate 70 मालिकेत आणखी मोठी बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, ही मालिका 50W वायरलेस चार्जिंग आणि 20W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करू शकते.
Huawei Mate 70 Series फीचर :