ETV Bharat / state

अटक केलेल्या आरोपींना बीड जिल्ह्यात ठेवू नये-भाजपा आमदार सुरेश धस यांची मागणी - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सत्ताधारी आमदार , विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड पोलिसांसह राज्य सरकारवर टीका केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे अपडेट्स वाचा.

Santosh Deshmukh murder case
सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरण अपडेट (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2025, 10:44 AM IST

बीड - सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात राज्य सरकारच्या आदेशानुसार एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे. असे असले तरी विरोधकांसह भाजपा आमदार सुरेश धस हे बीडमधील कायदा- सुव्यवस्थेसह एसआयटी चौकशीवर समाधानी नसल्याचं चित्र आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडची 'ऑन कॅमेरा' चौकशी करण्याची मागणी केली. कराडच्या खोलीत सीसीटीव्ही बसवावा, असे दमानिया यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं. वाल्मिक कराड कोठडीत असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये पलंग आणण्यात आल्यानं पोलिसांवर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी म्हटलं, "खूप खोटं बोललं जात आहे. पोलिसांना आराम करण्यासाठी पलंग आले. हे कुणालाच पटणारं नाही".

अटक केलेल्या आरोपींना बीडमध्ये ठेवू नये-"बीड जिल्ह्यात एका ठराविक समुदायाच्या अधिकाऱ्यांनी जास्त काळ सरकारी पदे भूषवली आहेत. त्यामुळे इतर समुदायाला दुर्लक्ष केले जात आहे, असे वाटते", असा दावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी दावा केला. सरपंच देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर आमदार धस म्हणाले, "मी त्यांचे नाव घेतलं नाही. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही". ते पुढे म्हणाले, "अटक केलेल्या आरोपींना बीड जिल्ह्यात ठेवू नये. कारण ते तपासावर परिणाम करू शकतात. त्यांची एकतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल कारागृहात किंवा नाशिक कारागृहात बदली करावी".

बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न- राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. "मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत संपविण्याचं श्रेय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना जाते. मात्र, बीडमध्ये इटलीमधील माफियांना लाजवेल इतकी भयानक दहशत आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या (अजित पवार) ताफ्यातील गाडी आरोपी पोलिसांसमोर हजर होण्यासाठी असेल तर हे धक्कादायक आहे". पुढे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, "महाराष्ट्र हे बिहार नाही तर महाराष्ट्र आता आफ्रिकेतील सर्वाधिक क्राईम रेट असलेल्या पीटरमारित्झबर्ग शहराप्रमाणं झालं आहे. एखाद्या माणसाला उचलून न्यायचे आणि थेट गायबच करून टाकायचे, असे प्रकार फक्त आफ्रिकेत व्हायचे. तेच आता बीडमध्येही घडते, हे आता उघड होऊ लागले आहेत".

हेही वाचा-

  1. संतोष देशमुख हत्याकांड: मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याची आमची मागणी; मी राजीनामा का द्यावा, धनंजय मुंडेंचा सवाल
  2. लहान आकाचे एन्काउन्टर होऊ शकते-विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
  3. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, एसआयटीत सर्व अधिकारी बीडचे!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.