मुंबई : पृथ्वीवरील अनेक प्राण्यांमध्ये घरचा रस्ता शोधण्याची अविश्वसनीय क्षमता असते. स्थलांतराच्या वेळी हजारो मैल उडणारे पक्षी असोत किंवा अन्न शोधून आपल्या घरामध्ये परतणाऱ्या मुंग्या असोत, अशा प्रत्येकाल घरी पोहचायच असतं. पण हे प्राणी नेहमी घरचा रस्ता कसा शोधतात? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे येथील संशोधकांनी या घटनेमागील रहस्य उलगडण्यासाठी रोबोटचा वापर केलाय. “आमच्या संशोधनाचं प्राथमिक उद्दिष्ट भौतिकशास्त्र समजून घेणं आहे. आम्ही सजीवांच्या गतिशीलतेची नक्कल करण्यासाठी या रोबोट्सचं मॉडेल बनवतोय," यातून अनेक रहस्य उलगडणार असल्याचं डॉ. नितीन कुमार म्हणाले.
घरी परतण्यासाठी प्रकाशाचा वापर :डॉ. कुमार यांच्या टीमनं एक रोबोट विकसित केला असून तो प्राण्यांमधील वर्तनाची नक्कल करतो. हा रोबोट स्वतःहून फिरण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ज्याप्रमाणं एखादा प्राणी अन्न शोधतो नंतर घरी परतण्यासाठी प्रकाशाचा वापर करतो. एका नवीन अभ्यासात, त्यांनी होमिंगच्या मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करण्यासाठी या चाराआणि होमिंग रोबोटचा वापर केलाय. जेव्हा रोबोटला घरी परत जावं लागतं, तेव्हा तो वेगळ्या मोडमध्ये जातो. संशोधक रोबोटवर प्रकाशाच्या तीव्रतेत हळूहळू बदल करतात. त्यामुळं रोबोट मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करतो. काही प्राणी सूर्य किंवा इतर पर्यावरणीय संकेत वापरू असं करू शकतात. संशोधकांनी प्राण्यांच्या वर्तनाची नक्कल करण्यासाठी डिझाइन केलेला छोटे रोबोट वापरून या नमुन्यांचं परीक्षण केलं. हे रोबोट्स, अंदाजे 7.5 सेमी व्यासाचं असून वस्तू आणि प्रकाश शोधण्यासाठी सेन्सरनं सुसज्ज आहे. ज्यामुळं तो रोबो प्रकाश स्रोताद्वारे त्याचं "घर" शोधू शकतो.