महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Hero Destini 125 भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर - Hero Destiny 125 - HERO DESTINY 125

Hero Destiny 125: Hero MotoCorp कंपनीनं जवळपास 6 वर्षांनंतर Hero Destiny 125 मध्ये मोठे अपडेट केले आहेत. या स्कूटरचा लुक आणि डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आली आहे. ही स्कूटर 59 किमी मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

Hero Destini 125
Hero Destini 125 (Hero)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 9, 2024, 4:46 PM IST

हैदराबाद : देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp नं आपली प्रसिद्ध स्कूटर Hero Destini 125 चं नवीन मॉडेल लॉंच केलंय. या स्कूटरमध्ये जवळपास 6 वर्षांनंतर अपडेट करण्यात आले आहेत. कंपनीनं नवीन Hero Destiny मध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ज्यामुळं मागच्या मॉडेलपेक्षा नविन मॉडेलमध्ये चांगले फिचर देण्यात आले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येणारी, या स्कूटरची प्रामुख्यानं Honda Activa 125 शी स्पर्धा असणार आहे.

Hero Destini 125 चं नवं रूप : कंपनीने नवीन डेस्टिनी VX, ZX आणि ZX Plus या तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. बेस VX व्हेरियंटला फ्रंट ड्रम ब्रेक्स मिळतात, लहान एलसीडी इनसेटसह एक साधा ॲनालॉग डॅश. i3s इंधन-बचत स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञान या दिलेलं नाही. तर मिड-स्पेक ZX व्हेरिएंट चांगल्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. त्याच्या मिड व्हेरिएंटला ब्लूटूथ-कनेक्टिव्हिटी, बॅकलिट स्टार्टर बटण, फ्रंट डिस्क ब्रेक, पिलियन बॅकरेस्ट तसेच ऑटो-कॅन्सलिंग इंडिकेटरसह डिजिटल डॅश मिळतोय. या सेगमेंटमध्ये हे फीचर पहिल्यांदाच दिल्याचा दावा कंपनीनं केलाय. ZX+ या टॉप-स्पेक व्हेरिएंटबद्दल सांगायचं तर, त्यात क्रोम ॲक्सेंटसह कांस्य वापरण्यात आलं आहे. तसंच अलॉय व्हील सुंदर बनवण्यात आले आहेत.

शक्ती आणि कार्यप्रदर्शन :या स्कूटरमध्ये 124.6 सीसी क्षमतेचं एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन वापरण्यात आलं आहे. जे 7,000 rpm वर 9hp ची पॉवर आणि 5,500 rpm वर 10.4Nm टॉर्क जनरेट करतं. ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 59 किमी पर्यंत धावू शकते, असा हीरो मोटोकॉर्पचा दावा आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये : कंपनीनं कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम (CBS) सर्व प्रकारांमध्ये दिली आहे. याशिवाय इंजिन कट ऑफ, बूट लाइटिंग (आसनाखालील स्टोरेजमध्ये प्रकाश), मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी यूएसबी चार्जिंग पोर्ट, सीटखाली 19 लिटर स्टोरेज आणि फ्रंट ऍप्रनमध्ये 2 लिटर स्टोरेज स्पेस उपलब्ध आहे. कंपनीने त्याच्या फ्रंट ऍप्रनमध्ये एक हुक देखील दिला आहे. जो 3 किलोपर्यंतचा भार वाहून नेण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. या स्कूटरमध्ये लुक आणि डिझाइन व्यतिरिक्त अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याच्या दोन्ही बाजूंना 12 इंच चाके आहेत. नवीन चाकांमुळे, डेस्टिनी 125 चा व्हीलबेस 57 मिमीनं वाढला आहे. त्याच्या ZX आणि ZX+ प्रकारांमध्ये 190 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहे. डेस्टिनी 125 मध्ये हे ब्रेक प्रथमच दिले आहे, तर बेस VX प्रकारात 130 मिमी ड्रम ब्रेक मिळतोय.

काय असेल किंमत :आतापर्यंत Hero MotoCorp नं या स्कूटरची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मागील मॉडेल दोन प्रकारांमध्ये आलं होतं, ज्याची किंमत 80,048 रुपयांपासून सुरू होती. आता कंपनी नवीन डेस्टिनी कोणत्याही किमतीत लॉन्च करतं का हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details