नवी दिल्ली Elon Musk : एक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी गुरुवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत फक्त विचार करुन व्हिडिओ गेम खेळता येत असल्याचं दिसतं. न्यूरालिंक उपकरण वापरुन हा गेम खेळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा रुग्ण बुद्धीबळ आणि व्हिडिओ गेम खेळत असल्याचं एलन मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे.
ब्रेन पॉवरनं खेळताना दिसतो गेम :एलन मस्क यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत नोलँड आर्बोग हा रुग्ण त्याचं मन वापरुन बुद्धीबळ खेळत असल्याचं दिसत आहे. स्क्रीनवर तो कर्सर दिसतो, तो मी आहे. मात्र ही सगळी ब्रेन पॉवर आहे, असं एलन मस्क यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत त्या रुग्णानं सांगितलं आहे. ऑनलाईन बुद्धीबळ खेळताना तो माऊस बाजूला सरकवताना व्हिडिओतही दिसतो. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
अंतर्ज्ञानी झाल्याचा भास होतो :एलन मस्क यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओतील नोलँड आर्बोग फक्त मनानं बुद्धीबळाचा गेम खेळत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओत ती व्यक्ती आपल्या मनानं व्हिडिओ गेम खेळत आहे. "मी माझा हात इकडं तिकडं हलवण्याचा प्रयत्न करेन, तिथून कर्सर हलत असल्याचं दिसतं. ही कल्पना माझ्यासाठी अंतर्ज्ञानी झाल्याचा भास घेऊन येते, असं नोलँड आर्बोग यावेळी म्हणाला.