महाराष्ट्र

maharashtra

एआय तंत्रज्ञानामुळं देशात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणार? आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर - Economic Survey Report

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 10:50 AM IST

Economic Survey Report : आगामी काळात भारतात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास सर्व प्रकारच्या कौशल्य आधारित नोकऱ्या करणाऱ्यांवर अनिश्चिततेची टांगती तलवार असणा आहे. याबाबतचा इशारा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालात देण्यात आलाय.

Economic Survey underscores dangers of AI for future workforces
एआय तंत्रज्ञान (File Photo)

नवी दिल्ली Economic Survey Report :'आधीच उल्हास त्यात फाल्गुन' अशी रोजगार निर्मितीत स्थितीत होण्याची शक्यता आहे.‘एआय’मुळं सर्व प्रकारच्या कौशल्य आधारित नोकऱ्यांमध्ये प्रचंड अनिश्चितता निर्माण होणार असल्याचा इशारा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालात दिलाय. तसंच एआय तंत्रज्ञानामुळं उत्पादन क्षमतेमध्ये निश्चित वाढ होईल. मात्र, रोजगार क्षेत्रावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असंही आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलंय.

जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळं निर्माण होणाऱ्या चलनवाढीमुळं 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5 टक्के ते 7 टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आलाय. तसंच गेल्यावर्षीच्या तुलनेत भारताचा विकासदर कमी राहणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती, कृषीक्षेत्रातील घसरण आणि बेरोजगारी हे घटक कारणीभूत असल्याचं निरीक्षण आर्थिक पाहणी अहवालात नोंदवण्यात आलंय.

अनिश्चिततेचं मोठं संकट-अहवालाच्या प्रस्तावनेत पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनी म्हटलयं की, "भांडवल-केंद्रित आणि ऊर्जा-केंद्रित एआयचा वाढणाऱ्या निम्न मध्यवर्गीय अर्थव्यवस्थेला फारशी गरज नाही. ‘एआय’च्या धोक्याबद्दल विचार करण्याची जबाबदारी कॉर्पोरेट क्षेत्राची असल्याचंही त्यांनी सूचित केलंय. तसंच सर्वेक्षणात असं नमूद करण्यात आलंय की गेल्या दोन वर्षांत आयटी क्षेत्रातील नोकऱ्या लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. एआयनं कामगारांवर होणाऱ्या परिणामाबाबत अनिश्चिततेचं मोठं संकट निर्माण केलंय."

एआयचा सामना कसा करावा?एआयला तोंड देण्यासाठी, कर्मचारी किंवा नोकरी शोधणाऱ्यांना संवाद, सहयोग आणि सादरीकरणाच्या पलीकडं कौशल्यं आवश्यक आहेत. यामध्ये विश्लेषणात्मक विचार आणि नाविन्य, जटिल समस्या सोडवणं, तंत्रज्ञान डिझाइन आणि प्रोग्रामिंग, लवचिकता आणि अनुकूलता यांचा समावेश आहे. तर भारत हा जागतिक स्तरावर एआयमध्ये आघाडीवर आहे. मात्र, एआयमध्ये फारसं संशोधन झालेलं नाही. ही तफावत या क्षेत्रातील संशोधन आणि विकासाची गरज अधोरेखित करते, असंही सर्वेक्षणातून सांगण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. एआय आधारित बनावट आणि व्हॉईस क्लोनिंग टाकू शकतो लोकसभा निवडणुकीवर प्रभाव, ते कसं टाळणार? - Lok Sabha Election 2024
  2. मानवी मूर्खपणा अन् प्रगती दरम्यान AI चा भविष्यातील प्रवास कसा असेल?
  3. महाराष्ट्र सरकारची AI ला साथ; महाराष्ट्र शासनाचा गुगलसोबत सामंजस्य करार

ABOUT THE AUTHOR

...view details