महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

DRDO-IIT दिल्लीनं केलं 'ABHED' बुलेट प्रुफ जॅकेट्स विकसित - ABHED Bullet Proof Jackets - ABHED BULLET PROOF JACKETS

ABHED Bullet Proof Jackets : DRDO तसंच IIT दिल्लीनं संयुक्तपणे ABHED नावाचं हलकं बुलेटप्रूफ जॅकेट तयार केलं आहे. हे बुलेटप्रूफ जॅकेट पूर्णपणे स्वदेशी आहे. हे जॅकेट आयआयटी, दिल्ली येथील डीआरडीओ सेंटर ऑफ इंडस्ट्री ॲकॅडमिक एक्सलन्समध्ये (DIA-CoE) डिझाइन केलं आहे.

ABHED Bullet Proof Jackets
ABHED बुलेट प्रुफ जॅकेट (PBI)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 26, 2024, 2:45 PM IST

हैदराबादABHED Bullet Proof Jackets :संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसह (DRDO) IIT दिल्लीच्या संशोधकांच्या सहकार्यानं 'ABHED' नावाचं हलकं बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलं आहे. हे जॅकेट पॉलिमर आणि देशी बोरॉन कार्बाइड सिरॅमिक मटेरियलपासून बनवलं आहे. या जॅकेटची रचना कोणत्याही प्रकारचा उच्च वेगाचा दाब सहन करू शकते. जॅकेटसाठी आर्मर प्लेटनं प्रोटोकॉलनुसार सर्व आवश्यक संशोधन आणि विकास चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. हे जाकेट बहुतेक धोके सहन करण्यास सक्षम आहे.

हलकं वजन असलेलं बुलेट प्रूफ जॅकेट हे डीआरडीओ, शिक्षण आणि उद्योग यांच्या संरक्षण संशोधन विकासाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. - डॉ. समीर व्ही. कामत, अध्यक्ष डीआरडीओ

ABHED बुलेट प्रुफ जॅकेट (PBI)

360 डिग्री तापमाणाचं संरक्षण करणार :भारतीय सैन्याच्या आवश्यकतेनुसार कमाल वजन मर्यादेपेक्षा ते हलकं आहे. विविध BIS स्तरांसाठी किमान संभाव्य वजन 8.2 किलो तसंच 9.5 किलोग्रॅमसह, हे मॉड्यूलर-डिझाइन केलेलं जॅकेट फ्रंट आणि बॅक आर्मरसह 360 डिग्री तापमाणाचं संरक्षण करेल. त्याची निर्मिती लवकरच होणार आहे. त्यासाठी काही उद्योगांची निवड करण्यात आली आहे.

डीआयए-सीओईची उभारणी :संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रात उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांना सहभागी करून घेण्यासाठी वर्ष 2022 मध्ये आयआयटी दिल्ली या संस्थेत असलेल्या डीआरडीओच्या संयुक्त प्रगत तंत्रज्ञान केंद्रात बदल घडवून आणून डीआयए-सीओईची उभारणी करण्यात आली होती. हे केंद्र आता डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातील संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्पांवर काम करत आहे.

हे वाचलंत का :

  1. आता वीज बिलापासून मिळवा मुक्ती : नागरिकांना मिळते मोफत वीज, घरबसल्या इथं करा अर्ज - Muft Bijli Yojana
  2. रेडमी वॉच 5 लाइटची दमदार एंट्री, 18 दिवसांपर्यंत टिकते बॅटरी - Redmi Watch 5 Lite Launched
  3. Tata Nexon CNG फक्त 8.99 लाख रुपयांना, Nexon मिळतोय बंपर डिस्काउंट - Tata Nexon CNG launched

ABOUT THE AUTHOR

...view details