हैदराबाद :सरकारच्या दूरसंचार विभागानं बनावट कॉल्स रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. अलीकडेच, विभागानं 1.77 कोटी मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. या मोबाईल नंमबरचा वापर बनावट कॉल करण्यासाठी होत होता. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या सहकार्यानं, देशातील 122 कोटी दूरसंचार वापरकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. त्यामुळं ग्राहाकांना फेक कॉलपासून दिलासा मिळणार आहे.
बनावट कॉल्सविरोधात कारवाई :दूरसंचार विभाग आणि ट्राय यांनी संयुक्तपणे बनावट कॉल्सविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ट्रायनं गेल्या महिन्यातच एक नवीन धोरण आणलं होतं. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे 1.35 कोटी बनावट कॉल्स थांबवत असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय विभागानं बनावट कॉल करणारे 1.77 कोटी मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. लोकांच्या तक्रारींवर कारवाई करत विभागानं पाच दिवसांत सुमारे 7 कोटी कॉल ब्लॉक केले आहेत. ही मोहिमेची सुरुवात असल्याचं विभागानं म्हटलं आहे.
फेक कॉल्स बंद होतील :दूरसंचार विभागानं बनावट कॉल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विभागानं लाखो सिमकार्ड बंद केले होते. बनावट कॉल्स रोखण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. तसंच, आतापासून कॉलर्सना फक्त व्हाइटलिस्टेड टेलीमार्केटिंग कॉल प्राप्त होतील.
11 लाख खाती गोठवली :अलीकडेच, दूरसंचार मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की, बँक आणि पेमेंट वॉलेटद्वारे जवळपास 11 लाख खाती गोठवण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी सिम कार्ड ब्लॉक केले जातील ,असे सरकारचं म्हणणे आहे. दूरसंचार विभागासह (DOT) कार्यरत चार दूरसंचार सेवा ऑपरेटर (TSPs) यांनी 45 लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स दूरसंचार नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून अवरोधित केले.
हे वाचलंत का :
- फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा Oppo Find X8 फोन, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
- Honda Amaze ची तिसरी एडिशन भारतात 4 डिसेंबर रोजी होणार लॉंच
- मारुतीनं लॉंच केली नवीन जनरेशन डिझायर 2024, जबरदस्त फीचर्ससह जाणून घ्या किंमत..