नवी दिल्लीDiscount on passenger vehicles : सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्वपूर्ण बैठक दिल्लीत झाली. नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर नवीन वाहनांच्या खरेदीवर 1.5-3 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वाहन खरेदीसाठी सवलत :केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग (RT&H) मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी भारत मंडपम येथे सियामच्या शिष्टमंडळासोबत एका बैठक घेतली. जिथं त्यांनी ऑटोमोबाईल उद्योगातील महत्त्वाच्या समस्यांचं निराकरण केलं. यावेळी शिष्टमंडळानं गडकरींच्या सल्ल्याला सकारात्मक प्रतिसाद देत, प्रवासी वाहन खरेदीसाठी सवलत देण्याचं मान्य केलं आहे. मर्सिडीज बेंझ इंडियानं आपल्या वाहन खरेदीवर 25 हजार रुपयांची सवलत दिली आहे. जी इतर वाहन कंपन्यापेक्षा अधिक आहे.
वाहनांच्या स्क्रॅपिंगला प्रोत्साहन :'व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्या दोन वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी सवलत देणार आहेत. तसंच प्रवासी वाहन उत्पादक कंपन्या एका वर्षाच्या मर्यादित कालावधीसाठी सवलत देणार असल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे'. या सवलतींमुळं वाहनांच्या स्क्रॅपिंगला प्रोत्साहन मिळणार आहे. ज्यामुळं रस्त्यावर सुरक्षित, स्वच्छ तसंच अधिक कार्यक्षम वाहनं चालवणं सोप होणार आहे.
प्रवासी वाहनावर 20 हजारापर्यंत सूट :निवेदनानुसार, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्युंदाई मोटर इंडिया, किया मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स, जेएसडब्ल्यू एमजी मोटर, रेनॉल्ट इंडिया, निसान इंडिया, स्कोडा, फोक्सवॅगन इंडिया या प्रवासी वाहन उत्पादक कंपन्या नवीन कारच्या एक्स-शोरूम किमतीच्या 1.5 टक्के सवलत देणार आहेत. तसंच मागील 6 महिन्यांत ग्राहकानं स्क्रॅप केलेल्या प्रवासी वाहनावर 20 हजारापर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालवाहू वाहनावर वाहन 3 टक्के सवलत :सिस्टीममध्ये स्क्रॅप केलेल्या वाहनाचं तपशील जोडण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. कंपन्या स्वेच्छेनं अतिरिक्त सवलती देऊ शकतात, असं देखील त्यात नमूद आहे. कार फक्त स्क्रॅप केली जात असल्यानं, एक्सचेंज आणि स्क्रॅप डिस्काउंट दरम्यान, फक्त स्क्रॅपेज सूट लागू होईल," असं त्यात म्हटलं आहे. टाटा मोटर्स, व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेइकल्स, अशोक लेलँड, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्स मोटर्स, इसुझु मोटर्स, एसएमएल इसुझु या व्यावसायिक वाहन उत्पादकांना 3.5 टन पेक्षा जास्त व्यावसायिक मालवाहू वाहनावर एक्स-शोरूम किमतीच्या 3 टक्के सवलत देतील. 3.5 टन पेक्षा जास्त GVW (एकूण वाहन वजन) असलेले व्यावसायिक मालवाहू वाहन स्क्रॅप करण्यासाठी एक्स-शोरूम किमतीच्या 2.75 टक्के समतुल्य सवलत असेल. बस आणि व्हॅनसाठीही या योजनेचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, मारुती सुझुकी इंडियाचे एमडी, सीईओ हिसाशी टाकुची, टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ,अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक, सीईओ शेनू अग्रवाल, टीव्हीएस मोटर कंपनीचे सीईओ केएन राधाकृष्णन यांच्यासह ऑटोमोबाईल उद्योगातील उच्च अधिकारी उपस्थित होते.
हे वाचलंत का :
- बजाज 100cc मध्येही CNG मोटरसायकल लाँच करणार - Bajaj 100cc CNG Motorcycle
ऑटोपायलट मोडमुळं ड्रायव्हरचा वर्कलोड कमी : टेस्ला मॉडेल 3 काय आहे ऑटोपायलट फिचर - Tesla Full Self Driving mode - टाटा कर्व्ह आयसीई, मारुती डिझायरसह 'या' 6 कार पुढील महिन्यात होणार लॉन्च - NEW CAR LAUNCHES IN SEP 2024