हैदराबाद Citroen Basalt crash tests : फ्रेंच कार उत्पादक कंपनी Citroen Basalt कारची प्रथमच क्रॅश चाचणी घेण्यात आली. भारत NCAP नं घेतलेल्या या क्रॅश चाचणीत कारनं चांगली कामगिरी केली आहे. या फ्रेंच कारनं क्रॅश चाचण्यांमध्ये प्रभावी 4-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केलं आहे. कंपनीनं Citroen Basalt SUV-Coupe भारतात 7.99 ते 13.83 लाख (एक्स-शोरूम) च्या आकर्षक किमतीत लॉन्च केली आहे. भारतीय क्रॅश टेस्टिंग एजन्सीद्वारे चाचणी केलेली ही पहिली नॉन-टाटा कार आहे. बेसाल्टनं ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) मध्ये 32 पैकी 26.19 आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) मध्ये 49 पैकी 35.90 गुण मिळवले. या रेटिंगमुळं कारचला 4-स्टार मिळाले.
सुरक्षा : फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्ट स्कोअर : 16.00 पैकी 10.19 गुण
साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्ट : 16.00 पैकी 16.00 गुण
16 पैकी 16 गुण :समोरासमोर झालेल्या धडकेत सुरक्षिततेच्या दृष्टीनं, ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या डोक्याला आणि मानेला चांगलं या टेस्टमध्ये नुकसान झाल्याचं दिसून आलं नाहीय. चालकाच्या छातीलाही चांगली सुरक्षा मिळाली. चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीलाही पुरेसी सुरक्षा मिळाली.यावेळी त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. साइड इफेक्ट चाचणीमध्ये, डोके, छातीला चांगली सुरक्षा मिळाल्याचं दिसून आलं. परिणामी कारला 16 पैकी 16 गुण मिळाले.
बाल संरक्षण :मुलांच्या सुरक्षेचा विचार केला तर या कारनं चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम वापरून डायनॅमिक टेस्टमध्ये 24 पैकी 19.90 गुण मिळवले आहेत. 18-महिन्याच्या मुलासाठी फ्रंटल आणि साइड प्रोटेक्शनसाठी, डायनॅमिक स्कोअर अनुक्रमे 8 पैकी 8 आणि 4 पैकी 4 होते. तथापि, फ्रंटल इफेक्टसाठी 3 वर्षांच्या मुलाचा डायनॅमिक स्कोअर 8 पैकी 3.9 निराशाजनक होता. साइड इफेक्टसाठी समान स्कोअर 4 पैकी 4 होता. या क्रॅश टेस्टमध्ये हा स्कोअर परिपूर्ण नसला तरी, तरीही हा स्कोअर प्रशंसनीय आहे. भारत एनसीएपीनं दिलेल्या माहितीनुसार, या कारच्या यू, प्लसच्या नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन प्रकारांवर ही क्रॅश चाचणी घेण्यात आली.
सिट्रोएन बेसाल्टची सुरक्षा वैशिष्ट्ये : बेसाल्टमध्ये उपलब्ध असलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल-स्टार्ट असिस्ट, ESC, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि सेन्सरसह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा समाविष्ट आहे.
यामध्ये उपलब्ध असलेल्या इंजिन पर्यायांबद्दल बोलायचं झाल्यास, यात 109 bhp पॉवरसह 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. ज्यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स उपलब्ध आहे. याशिवाय, यात 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील आहे. जो 82 bhp ची शक्ती प्रदान करतो. सोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.
सिट्रोएन बेसाल्ट किंमत :कंपनी Citroen Basalt ची 7.99 लाख ते 13.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान विक्री करत आहे. किमतीच्या आधारावर, ही कार Kia Sonet, Hyundai Venue, Mahindra XUV 3XO आणि मारुती ब्रेझा यांसारख्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीशी स्पर्धा करते. हे Tata Curvv, Hyundai Creta आणि Kia Seltos च्या लोअर-स्पेक प्रकारांशी देखील स्पर्धा करते.
हे वचालंत का :
- मारुती सुझुकी फ्रॉन्क्सनं केला 2 लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार
- Toyota Hyrider ची नवीन Festival Limited Edition लाँच, जाणून घ्या काय आहे खास
- मल्टिपल स्क्लेरोसिसमुळं कर्करोगाचा धोका वाढतो