हैदराबाद :ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झालाय. हा सेल दरवर्षी ख्रिसमसच्या आगोदर सुरू होतो. त्यामुळं सर्व कंपन्यांनी आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ब्लॅक फ्रायडे सेल लाइव्ह सेरू केला आहे. हा सेल Flipkart, Amazon आणि Myntra वरील सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर भारतात सुरू झालाय. या सेलद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे, गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते सर्व उत्पादनांपर्यंत सर्व वस्तू चांगल्या सवलतीत खरेदी करू शकता. भारतातील कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ब्लॅक फ्रायडे सेलचा लाभ घेऊ शकता? या बातमीतून जाणून घेऊया...
Amazon ब्लॅक फ्रायडे सेल : ब्लॅक फ्रायडे सेल आज Amazon वर सुरु झाला आहे. हा सेल 2 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. Amazon वर, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून कपड्यांपर्यंत सर्व उत्पादनांवर खूप चांगली सूट दिली जात आहे. Amazon ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान प्राइम सदस्यांना विशेष ऑफर देण्यात येत आहे.
Flipkart ब्लॅक फ्रायडे सेल :जर तुम्हाला फ्लिपकार्टवर या सेलचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडं फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. फ्लिपकार्टवरील ब्लॅक फ्रायडे सेलचा आज शेवटचा दिवस आहे. इथं तुम्हाला आजच्याच दिवस उत्तम सूट मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही घरगुती वस्तूंपासून ते गॅजेट्सपर्यंत सर्व गोष्टी खरेदी करू शकता.
Myntra ब्लॅक फ्रायडे सेल :Myntra वर ब्लॅक फ्रायडे सेल 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सेलचाल लाभ तुम्ही 1 डिसेंबरपर्यंत घेऊ शकता. Myntra सर्व प्रीमियम ब्रँड्सवर 50-80% सूट देत आहे. या सेलमध्ये तुम्ही कपडे सौंदर्य प्रसाधनं, मोबाईल, कपडे अशा उत्पादनांवर चांगल्या ऑफर मिळवू शकता.