महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

जुने फोन घेणाऱ्यांपासून सावधान! सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचतोय डेटा - Beware of old phone takers - BEWARE OF OLD PHONE TAKERS

Beware of old phone takers : जर तुमच्याकडे जुना मोबाईल असेल आणि तुम्ही तो निरुपयोगी समजत असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. कारण सध्या सायबर गुन्हेगारांची टोळी हे मोबाईल गोळा खरेदी करताय. त्यामुळं तुम्हाला मोठा चुना देखील लागू शकतो.

Representative photos
प्रातिनिधिक फोटो (Etv Bharat National Desk)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 14, 2024, 11:32 AM IST

निजामाबाद (तेलंगणा) Beware of old phone takers :फसवणूक करणारे नवनवीन पद्धती वापरत आहे. सायबर गुन्हेगारांनी जुन्या मोबाईलच्या बदल्यात लोकांना स्टीलची भांडी दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये गुन्हेगार मोबाईलचा वापर करून फसवणूक करत आहेत. या संदर्भात अधिका-यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. सायबर गु्न्हेगार कारमध्ये फिरून नागरिकांना अशा ऑफर देताय. त्यामुळं हे फोन अनेकदा सायबर गुन्हेगारांच्या हाती लागतात. बिहारमधील लोक विविध जिल्ह्यांमध्ये सक्रियपणे जुने फोन खरेदी करत, असल्याचं दिसून आलं आहे.

कारवाईत चार जणांना अटक : त्याच वेळी, देवघर, झारखंड येथून कार्यरत सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी हे फोन वापरत असल्याची माहिती उघड झालीय. तेलंगणातील पेडापल्ली जिल्ह्यांतर्गत रामागुंडम येथे एका मोठ्या कारवाईत चार जणांना 4,000 मोबाईल फोनसह अटक करण्यात आली. ज्यामुळं या गुन्हेगारांचा भांडाफोड झालाय.

कसा होतो घोटाळा? :सायबर गुन्हेगार तुमच्या जन्या फोनच्या बदल्यात स्टीलची भांडी देण्याची ऑफर देतात. त्यानंतर गुन्हेगार मोबाईमधील UPI आयडी, फोन नंबर आणि फोटो यासारखा मौल्यवान वैयक्तिक डेटा काढून घेतात. त्यांना कोणताही उपयुक्त डेटा न मिळाल्यास, ते फोन दुरुस्त करतात. त्यानंतर फसवणूक करण्यासाठी त्यामध्ये बनावट सिम कार्ड टाकतात. त्यानंतर सायबर क्राईमसाठी अशा फोनचा वापर केला जातो. पोलीस तपास सुरू झाल्यास, मूळ फोनचा मालकावर गुन्हा नोंदवला जातो, कारण इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) नंबर मुळ मालकाच्या नावावरच राहतो.

फोन अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत :नुकतेच, निजामाबाद परिसरातील गंगास्थान, मारुती नगर आणि विनायक नगर यांसारख्या भागात संशयास्पद लोकांकडून अशाच प्रकारच्या एक्सचेंज ऑफर दिल्या जात असल्याचं वृत्त आहे. या संदर्भात, लोकांना अशा ऑफरची वैधता तपासण्यास पोलिसांनी सांगितलंय. तसंच तुमचे जुने फोन अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत, काही शंका असल्यास, त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे.

हे वाचलंत का :

  1. Honor 200 Lite 5G लाँचची तारीख जाहीर, 108MP रियर कॅमेरा - Honor 200 Lite 5G
  2. Realme P2 Pro 5G लॉंन्च, 80 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधाही - Realme P2 Pro 5G Launch
  3. Samsung Galaxy M05 भारतात 8 हजारात लॉन्च, 50 मेगापिक्सेल कॅमेरा - Samsung Galaxy M05 launched

ABOUT THE AUTHOR

...view details