हैदराबाद :बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देशात नविन ईव्ही लॉंच करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये अपडेट चेतक ईव्ही समाविष्ट करणार आहे. कंपनी या महिन्यात 20 डिसेंबर रोजी ही नवीन स्कूटर लॉंच करणार आहे. या स्कूटरला नवीन चेसिस आणि मोठी बूट स्पेस मिळेल. मात्र, त्याची रचना सध्याच्या मॉडेलप्रमाणेच असेल. इतकेच नाही तर त्याची किंमतही सध्याच्या मॉडेलप्रमाणे असू शकते.
नवीन डिझाइन :आजकाल Ather Rizza, Ola S1, आणि TVS iQube सारखे स्पर्धक चेतकला टक्कर देताय. त्यामुळं बजाजला चेतकमध्ये अधुनिक वैशिष्ट्याचा समावेश करावा लागतोय. त्यामुळंच कंपनीनं नवीन चेतकसाठी चेसिस डिझाइन केलीय. ज्यामुळं ग्राहकांना अधिक बूट स्पेस मिळणार आहे. चेसिस डिझाइन, नवीन बॅटरी पॅक डिझाइनमधील बदलांमुळं त्याची कार्यक्षमता देखील वाढू शकते. बजाज चेतक सध्या मॉडेलवर अवलंबून 123 ते 137Km ची दावा केलेली IDC श्रेणी ऑफर करते. स्कूटरच्या डिझाइनसह इतर गोष्टी पूर्वीसारख्याच राहण्याची शक्यता आहे. चेतकची एक्स-शोरूम किंमत 96 हजार ते 1.29 लाख रुपये असू शकते.