हैदराबाद : भारतात ॲपलनं नवा विक्रम केला आहे. कंपनीनं सप्टेंबरमध्ये हा विक्रम केला आहे. अशा परिस्थितीत ॲपल आता भारताकडं पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. यामुळंच कंपनी भारतात नवीन रिटेल स्टोअर्स उघडण्याचा विचार करत आहे. खुद्द ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी ही माहिती दिली आहे. Apple ने जुलै ते सप्टेंबर पर्यंत 94.9 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. त्यांचा व्यावसाय मागिल वर्षिच्या तुलनेत सुमारे 6 टक्क्यानं वाढला आहे. भारतातील महसूलात झालेली वाढ पाहून टीम कुकनं 4 नवीन स्टोअर भारतात उघडण्याची योजना आखली आहे.
आयफोनबद्दल बोलायचं झालं तर फोन प्रत्येक परिस्थितीत चांगली कामगिरी करत आहे. सप्टेंबर तिमाहीचा महसूल खूप वाढला आहे. महसुलाबद्दल बोलायचं तर तो 12 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी भारताचा उल्लेख करताना टीम कुक म्हणाले, 'भारतातील लोकांचा उत्साह पाहून आम्हाला आश्चर्य वाटत आहे. यामुळंच आम्ही महसूलात विक्रम केला आहे. ॲपलसाठी हे खूप खास आहे.'