हैदराबाद Apple iPhone 16 Launched : iPhone 16 Pro आणि 16 Pro Max : Apple नं iPhone 16 Pro मध्ये दमदार कॅमेरा दिलाय. यात 48MP मुख्य सेन्सर आहे, जो चांगले फोटो घेण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त, यात 12MP अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स आहे, जे मोठं क्षेत्र कॅप्चर करू शकते. यात 5x टेलीफोटो लेन्स असून दूरच्या वस्तू जवळून कॅप्चर करता येतील. iPhone 16 Pro आणि Apple 16 Pro Max A18 Pro चिपसेटवर चालतात. iPhone 16 Pro ची किंमत $999 (अंदाजे रु 83,877) पासून सुरू होते. त्याच वेळी, iPhone 16 Pro Max ची किंमत $1199 (अंदाजे रुपये 1,00,669) पासून सुरू होते. या दोन्ही आयफोनची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
iPhone 16 Pro ॲल्युमिनियमचा वापर :iPhone 16 Pro ला टायटॅनियम बॉडी मिळते. iPhone 16 Pro Max मध्ये सर्वात शक्तिशाली बॅटरी आहे. iPhone 16 Pro मध्ये पूर्णपणे नवीन डिझाइन वापरण्यात आलं आहे. तसंच नवीन रंगात देखील हा फोन उपलब्ध आहे. iPhone 16 Pro दोन आकारात येतो - 6.3 इंच आणि 6.9 इंच. iPhone 16 Pro Max ची बॅटरी जास्तीत जास्त बॅकअप देते. हा स्मार्टफोन अतिशय वेगवान असून यात शक्तिशाली कॅमेरा आहे, असं ॲपलनं म्हटलं आहे. या फोनमध्ये अनेक नवीन एआय-पावर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. अशा स्थितीत हा फोन अतिशय स्मार्ट झाला असून वापरकर्त्यांचे काम सोपे होणार आहे. Apple ने त्यांच्या नवीन iPhone 16 Pro उपकरणांमध्ये टायटॅनियम आणि ॲल्युमिनियमचा वापर केला आहे, ज्यामुळे हे फोन हलके आणि मजबूत बनले आहेत.
iPhone 16 आणि 16 Plus ची भारतात किंमत : iPhone 16 हँडसेटमध्ये हार्डवेअर आणि चिपसेट देण्यात आले आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झालं तर, iPhone 16 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $799 (अंदाजे 67,000 रुपये) आणि iPhone 16 Plus 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $899 (अंदाजे 75,000 रुपये) आहे.