हैदराबाद : पेट्रोल आणि डिझेलचा खर्च टाळण्यासाठी ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळंच इलेक्ट्रिक कंपन्या देखील एकामागून एक इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात बाजारात लॉंच करत आहेत. तसंच केंद्रासह राज्य सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्यासाठी विशेष योजना राबवत आहे. त्यातचं आता तेलंगना सरकानं ईव्ही खरेदीवर मोठा दिलासा देण्याची घोषणा केली आहे.
इलेक्ट्रिक वाहनं खरेदीवर सूट :तेलंगना सरकानं नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही जर तेलंगानात नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी असाल, तर तुम्हाला टॅक्समध्ये सुट मिळणार आहे. ग्राहकांना नविन गाडी खरेदी करताना रोड टॅक्स किंवा नोंदणी शुल्क आता भरावं लागणार नाहीय. राज्य सरकारनं ईव्ही खरेदीवरील नोंदणी शुल्क आणि रोड टॅक्स माफ केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तेलंगणा सरकारचे हे मोठं पाऊल मानलं जात आहे.
जर तुम्ही तेलंगणाचे रहिवासी असाल, तर तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क भरावं लागणार नाही. या निर्णयामुळं केवळ प्रदूषण कमी होण्यास मदत होणार नाही, तर लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडं आकर्षित करण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे.
तेलंगणाचे नवीन ईव्ही धोरण : तेलंगनाचे परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी सांगितलं की, नवीन ईव्ही धोरण सोमवारपासून (18 नोव्हेंबर) सरकारी आदेश 41 नुसार लागू होईल. राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांसाठी रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कामध्ये 100 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादला प्रदूषणमुक्त करणं हा या निर्णयाचा उद्देश आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर मिळतील फायदे : राज्य सरकार इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक प्रवासी वाहनं, जसं की टॅक्सी, खाजगी कार, इलेक्ट्रिक तीन आसनी ऑटो रिक्षा, तीनचाकी वाहनांसह इलेक्ट्रिक लाईट मालवाहू वाहनांना रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कात 100 टक्के सूट देणार आहे. मालवाहतून वाहनं, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक बसचा देखील यात समावेश असेल. इलेक्ट्रिक बसेसच्या बाबतीत, ही सूट केवळ तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवर लागू असेल.
इलेक्ट्रिक वाहनाला चालना :इलेक्ट्रिक वाहनं ग्रीन मोबिलिटीसाठी ओळखली जातात, तर पेट्रोल आणि डिझेल वाहनं प्रदूषण पसरवण्यात मोठी भूमिका बजावतात. त्यामुळं इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देऊन शहराची हवा स्वच्छ करण्याची सरकारची इच्छा आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देऊन सरकारला रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत.
हे वाचलंत का :
- स्कोडाचं भारतात सीएनजी तंत्रज्ञानावर काम
- पेट्रोलचं झंझट गायब, Activa EV 27 नोव्हेंबर होणार लाँच, बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 70 किमी पर्यंतची रेंज
- Huawei Mate 70 सीरीज 26 नोव्हेंबर होणार लॉंच, Kirin 9100 चिप आणि प्रगत बॅटरी