महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासावर झिशान सिद्दिकी असमाधानी; म्हणाले, "तपास निराशाजनक व दुर्दैवी" - BABA SIDDIQUE MURDER CASE

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तपासावर माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली.

Zeeshan Siddique Baba Siddique case investigation
झिशान सिद्दिकी - बाबा सिद्दिकी (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 9:34 PM IST

Updated : Jan 28, 2025, 9:45 PM IST

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासावर त्यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली. "या प्रकरणी पूर्ण चार्जशीट आपण वाचलेली नाही. मात्र, जेवढी वाचली त्यावर निराश आहे. ज्या पद्धतीनं तपास होत आहे, त्यावर असमाधानी व निराश आहे. या प्रकरणाच्या जबाबामध्ये मी अनेकांची नावं घेतली होती. मात्र, आम्ही ज्यांची नावं घेतली होती, त्यापैकी कुणाचीही चौकशी करण्यात आली नाही, हे दुर्देवी," असं ते म्हणाले. मंगळवारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.

माझी हत्या होऊ शकते : "बाबा सिद्दिकींवर झालेला हल्ला म्हणजे भित्र्या, घाबरट लोकांनी मागून केलेला वार आहे. समोरून मर्दाप्रमाणं वार करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती आणि मागून त्यांनी वार केला. ते माझा जीव घेऊ शकतात, माझी हत्या करू शकतात. मात्र, मला किंवा माझ्या कुटुंबियांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची पूर्ण जबाबदारी मी जबाबामध्ये ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत, त्या सर्वांची असेल. त्या सर्व बिल्डरांची जबाबदारी असेल, मात्र त्यानंतरही कदाचित चार्जशीटमध्ये बिल्डरांचा काही सहभाग नाही असं म्हटलं जाईल," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कायदा व सुव्यवस्थेची चेष्टा : "मी नावं घेतली त्यापैकी कुणाचीही चौकशी करण्यात आली नाही हे आश्चर्यजनक आहे. त्याबाबत त्यांना न्यायालयाला व मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल. मुख्यमंत्री याबाबत पोलिसांकडं विचारणा करतील, असा मला विश्वास आहे. मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्थेची चेष्टा चालली आहे," असा आरोप झिशान सिद्दिकी यांनी केला.

हेही वाचा -

  1. छोटा शकील अन् सिद्दिकी कुटुंबाचे संबंध? बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनिल परबांचा मोठा गौप्यस्फोट
  2. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात कोणाकडे बोट दाखवले जात असल्यास नव्याने तपास करावा, अंबादास दानवेंचं वक्तव्य
Last Updated : Jan 28, 2025, 9:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details