पुणे Yellow Alert In Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात पाऊस पडत आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असून पुढील दोन दिवसात राज्यात हवामान विभागाच्यावतीनं यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्यावतीनं वर्तवण्यात आली आहे.
किनारपट्टीवर वारा वाहण्याची शक्यता :हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार राज्यातील कोकण गोवा विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता तसेच सोसायट्याचा वारा आणि गारांचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा वाहण्याची देखील शक्यता आहे.
गारांचा पाऊस पडण्याची शक्यता :मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता तसेच सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता तसेच सोसायट्याचा वारा वाहण्याची आणि गारांचा पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे.
सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता :विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील आहे. राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांना मिळणार दिलासा :विदर्भात उन्हाचा पारा वाढत होता. अशातच आता हवामान विभागाच्यावतीनं पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाऊस पडल्यानं उन्हाच्या तीव्रतेनं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल.
हेही वाचा :
- कोकण मतदारसंघात चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर जैन यांनी भरला अर्ज - Graduate Constituency Election
- लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत वाद, निलेश राणेंचा उदय सामंतावर गंभीर आरोप - Controversy in Mahayuti
- राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण; 'या' तारखेला मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ, राज्याला अनेक मंत्रिपदांची आशा - PM Narendra Modi Oath Ceremony