महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई - WORLI HIT AND RUN

Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आली आहे.पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. पण तो सापडत नव्हता.

Worli Hit and Run Case
वरळी हिट अँड रन (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 4:14 PM IST

Updated : Jul 9, 2024, 4:55 PM IST

मुंबई Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून पोलिसांनी आरोपी मिहिर शाह याला मुंबईतून अटक केली आहे. आरोपी मिहीर शाह अपघात घडल्यानंतर फरार झाला होता. पण पोलिसांनी अखेर मिहीर शाह याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केलीय. या 12 जणांना शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. या 12 जणांमध्ये मिहिर शाहची आई आणि बहिणीचादेखील समावेश आहे. या 12 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मिहीर शाह याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

मिहीर शाह याला अटक (ETV Bharat Reporter)

दोन दिवसांपांसून होता फरार : आरोपी मिहीर शाह यानं वरळी परिसरात भरधाव कारनं एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली होती. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला फरफटत नेलं होतं. त्यानं धडक दिल्यानंतर गाडी थांबवली असती तर महिलेचे प्राण वाचू शकले असते. पण त्यानं गाडी न थांबवता दूरपर्यंत महिलेला फरफटत नेलं. यामुळं महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी मिहीर शाह आपली गाडी मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर इथं सोडून पळून गेला होता. त्यानं तिथून पळून जाण्याआधी त्याचे वडील राजेश शाह यांच्यासोबत फोनवर बातचित केल्याची माहितीही समोर आली होती. यानंतर आरोपी मिहीर शाह यानं फोन बंद केला आणि पळून गेला होता. पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. पण तो सापडत नव्हता. अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.

मुंबई BMW हिट अँड रन प्रकरण : शिवसेना नेते राजेश शाह यांनी आपल्या मुलाला वाचवण्याचा कट रचला होता, मात्र आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारनं स्कूटर चालवणाऱ्या महिलेला चिरडलं होतं. त्यात तिचा मृत्यू झाला होता. कार चालवणारी व्यक्ती शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा असून तो फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती. दुसरीकडं पोलिसांनी राजेश शाह, बिदावत यांना अटक केलीय. आता या प्रकरणात मोठं खुलासा होत आहेत. पोलिसांनी नवीन वस्तुस्थिती न्यायालयात मांडली असून मिहीरनं स्वत:ला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा :

  1. वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहीर शाहनं पार्टी केलेला जुहूतील बार सील - Worli hit and run case
  2. कुठे पोलीस तर कुठे पती-पत्नी; राज्यात दोन दिवसांत तीन 'हिट अँड रन'च्या घटना, चार जणांचा बळी - Hit and Run Accident
Last Updated : Jul 9, 2024, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details