महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरळीत 'हिट अँड रन'चा थरार; नेत्याच्या BMW नं उडवल्यानं महिलेचा मृत्यू, दोघांना अटक - Worli Hit And Run Accident - WORLI HIT AND RUN ACCIDENT

Worli Accident : पुण्यानंतर आता मुंबईतील वरळीत हिट अँड़ रनची घटना रविवारी पहाटे घडली. ॲट्रीया मॉलजवळ एका कोळी दाम्पत्याला पहाटे एका BMW गाडीनं उडवलं. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय. ही गाडी पालघरमधील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याची असल्याची माहिती समोर आली.

Worli Hit And Run Accident
कारच्या धडकेत मृत्यू झालेली महिला (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 11:47 AM IST

Updated : Jul 7, 2024, 9:56 PM IST

मुंबई Worli Hit And Run Accident : पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणानं संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर कार अपघाताची प्रकरण कमी होतील, असं वाटत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी हिट अँड रन प्रकारचे अपघात घडत आहेत. मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना समोर आल्यानं मुंबई हादरली. BMW गाडीनं एका दाम्पत्याला उडवलं. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा उपनेता राजेश शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. राजेश शहा यांचा मुलगा आरोपी मिहीर शहा फरार असून, ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिदावतला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती झोन तीनचे डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा राजेंद्रसिंग बिदावत आणि आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा यांना अटक केली.

वरळीत 'हिट अँड रन'चा थरार (ETV Bharat Reporter)

मिहीरच्या वडिलांना अटक :वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेले राजेंद्रसिंग बिदावत आणि आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा यांना अटक केली आहे. मिहीर शाह फरार असून, त्याला शोधण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली.

गुन्हा दाखल करुन दोघे ताब्यात : "वरळी पोलिसांनी मुंबईतील वांद्रे परिसरातून बीएमडब्ल्यू कार जप्त केली आहे. पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेले राजेंद्रसिंग बिदावत आणि कार मालक राजेश शहा यांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे, घटनेवेळी कारमध्ये बसलेला मिहीर शहा फरार आहे," अशी माहिती झोन तीनचे डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.

कसा घडला अपघात? : वरळी भागातील प्रसिद्ध असलेल्या ॲट्रीया मॉलजवळ हिट अँड रनची घटना रविवारी (7 जुलै) पहाटेच्या सुमारास घडली. कोळीवाडा परिसरात राहणारं प्रदीप नाकवा आणि कावेरी नाकवा हे दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन घराबाहेर पडले होते. मच्छी घेतल्यानंतर परत येत असताना त्यांच्या दुचाकीला एका चारचाकी वाहनानं धडक दिली. नाकवा दाम्पत्याकडे दुचाकीवर मोठ्या प्रमाणात मच्छी आणि सामान असल्यामुळं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. दोघेही चारचाकीच्या बोनेटवर पडले. प्रसंगावधान राखत पतीनं बोनेटवरून बाजूला उडी घेतली. मात्र, महिलेला स्वतःला उडी घेता आली नाही. अचानक झालेल्या अपघतामुळं चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर चालकानं गाडी पळवत नेली. त्यानं बोनेटवर पडलेल्या महिलेला फरफटत नेलं.

बीएमडब्ल्यू कार पालघर येथील एका राजकीय पक्षाच्या नेत्याची असून, चालकासह राजकीय नेत्याचा मुलगा कारमध्ये बसला होता. कावेरी नाकवा (वय ४५) असं मृत महिलेचं नाव असून, ती वरळी कोळीवाडा येथील रहिवासी आहे. पुढील तपास सुरू आहे : मुंबई पोलीस

महिलेचा मृत्यू : या अपघातात पती थोडक्यात बचावला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली होती. महिलेला मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्यामुळं डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात हिट अँड रनच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. पुणे, जळगाव, बुलढाणा, तसंच राज्यातील इतर शहरातदेखील असे प्रकार घडत आहे. रस्त्यावरून पायी चालणाऱ्यांनादेखील आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालावं लागत आहे.

हेही वाचा -'वरळी हिट अँढ रन' प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची आदित्य ठाकरेंची मागणी; मुख्यमंत्री म्हणाले, "शिवसेनेचा कार्यकर्ता असला..." - Worli Hit And Run Accident

Last Updated : Jul 7, 2024, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details