प्रतिक्रिया देताना वर्षा खोब्रागडे आणि डॉ. प्रशांत आमले (Amravati Reporter) अमरावती Best Cooking Oil : आहारातील खाद्य तेल आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. स्वयंपाक गृहात वापरले जाणारे तेल शुद्ध आहे की, अशुद्ध याची आपल्याला कल्पना नसते. तसं पाहिलं तर तेल हा आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे तेल जर भेसळयुक्त असेल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. मात्र, ही भेसळ डोळ्यांनी शोधणं अवघड आहे. हे भेसळयुक्त तेल जास्त काळ वापरल्यास आरोग्याला हानी होऊ शकते. भेसळयुक्त तेलाचे सेवन केल्यानं बीपी, हृदयविकाराचा झटका, कर्करोग यांसारख्या घातक आजारांचा धोका वाढू शकतो. या आजारांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर तेल खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता ओळखणं गरजेचं आहे.
'लाकडी घाण्याचे तेल' वापरण्याचा दिला सल्ला : खाद्यतेलाच्या वाढत्या मागणीमुळं मोठ्या कंपन्यांनी बाजारात प्रवेश केलाय. रिफाइंड तेल तयार करून त्यात भेसळ करून विक्री केली जात असल्याच्या बातम्या पाहावयास मिळतात. रिफाइंड तेलामुळं शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतंय. तसेच इतर आजारही वाढतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी सुजाण नागरिकानी 'लाकडी घाण्याचे तेल' वापरण्याचा सल्ला आयुर्वेदाचार्य यांनी दिलाय. ते स्वता देखील गेल्या काही वर्षांपासून 'लाकडी घाण्याचे तेल' वापरात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळंच अलीकडच्या काळात लाकडी घाण्याच्या तेलाला मागणी वाढल्याची दिसून येतेय.
लाकडी घाणे पडणे बंद: पूर्वी जवस, शेंगदाणे, करडई इत्यादी सर्व प्रकारचे खाद्यतेल हे पारंपारिक पद्धतीने लाकडी घाण्याला बैल जुंपून घरीच काढले जात होते. कालांतरानं लाकडी घाणे बंद झालेत. पूर्वीच्या काळी घरच्या शेतात पिकवलेल्या सूर्यफूल, कारळे, शेंगदाणे आणि तीळ यांचे तेल काढले जात होते.
शहरात वाढली लाकडी घाण्याची संख्या : नागरिकांचा आरोग्य जपण्याचा कल वाढलेला दिसून येतोय. खाण्यापिण्याच्या सवईमध्ये सुद्धा मोठा बदल पाहावयास मिळत आहे. लाकडी घाण्याच्या तेलाला शहरात मागणी वाढत असल्यामुळं शहरात लाकडी घाण्याची संख्या वाढलेली आहे. लाकडी घाण्यावर तेल काढताना अगदी नगण्य अशी उष्णता निर्माण होते. त्यामुळं तेलातील नैसर्गिक तत्व जपले जातात. जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असे तेल मिळू शकते. त्याचबरोबर लाकडी घाण्यावरील तेल हे स्वच्छ तेलबिया वापरून काढले जाते.
लाकडी घाण्यावरील तेलाचे फायदे : शुद्ध तेलाचा वास येतो. कारण त्या तेलात 4 ते 5 प्रकारची प्रोटीन्स असतात, त्याला गंध असतो. शुद्ध तेलाचा चिकटपणा जास्त असतो. कारण त्यामध्ये आवश्यक असणारे फॅटी ॲसिड असते, व्हिटॉमिन ई आणि मिनिरल्स सुद्धा असतात. लाकडी घाण्यावरचे तेलच खाण्यासाठी सर्वोत्तम आहे. कारण तेल काढताना लाकडी घाणे असल्यामुळं शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही. शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त 14 वेळाच फिरतो (म्हणजे या घाण्याचा आर पी एम. 14 आहे.) त्यामुळं लाकडी घाण्याचे तेल काढताना तेलातील एकही नैसर्गिक घटक कमी होत नाही.
घाण्यावरील तेलाला वाढली मागणी : काही महिन्यापर्वी शहरात दहा जणांनी मिळून पाच महिन्यांपूर्वी "WEऑइल मिल मॅन्युफॅक्चरिंग" या नावाने लाकडी घाण्याचे तेल निर्मितीचा उद्योग सुरू केलाय. संचालक शांताराम इंगोले सांगतात की, एका दिवसात सरासरी 50 किलो शेंगदाणा तेल काढले जाते. काढलेले तेल एका दिवसात विकले जाते. खरेदीदारांकडून चांगली मागणी वाढली आहे. तेलाची विक्री करणाऱ्या WE ग्रेन्सच्या संचालिका वर्षा खोब्रागडे सांगतात की, महिन्याला २५ ते ३० लिटर तेल विकले जाते. काही वेळा ग्राहकांना तेल कधी उपलब्ध होईल याची वाट पाहावी लागते. एकंदरीत लाकडी घाण्याचे तेल खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसून येतय.
हेही वाचा -
- Cooking Oil : स्वयंपाकासाठी योग्य तेल कोणते? सविस्तर जाणून घ्या...
- Moha Tree In Melghat: मेळघाटातील मोहाचा प्रवास दारूकडून औषधीकडे; आदिवासींनाही मिळाला विकासाचा मार्ग
- Almond Oil : डार्क सर्कलपासून ते चेहऱ्यवरील दाग-धब्बे दूर करण्यापर्यंत उपयोगी ठरते बदामाचे तेल...