महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमधल्या माय-लेकींनी सरकारी साड्यांसह मोदींच्या छायचित्राच्या पिशव्या केल्या परत, शाळेत शिक्षक देण्याची मागणी - women returned sarees - WOMEN RETURNED SAREES

women returned sarees : राज्य सरकारनं आनंद शिधासोबत दिलेल्या साड्या निकृष्ट असल्याचा आरोप करत महिलांनी त्या परत केल्या आहेत. या सोबतच महिलांनी मोदींचं छायचित्र असलेल्या पिशव्या देखील परत केल्या आहेत. साड्या देण्यापेक्षा आमच्या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक द्या, अशी मागणी या महिलांनी तहसीलदारांकडं केलीय.

women returned sarees
women returned sarees

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 10:48 PM IST

पालघरwomen returned sarees : राज्य सरकारनं आनंद शिधा बरोबरच या वर्षी अंत्योदय योजनेतील महिलांना साडी भेट देण्याचा निर्णय घेतला; परंतु या साड्या निकृष्ट असल्यामुळं राज्यभरात महिला आंदोलन करत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये महिलांनी शंभर साड्यांसह मोदी यांच्या नावाच्या पिशव्या परत करून वेगळं आंदोलन केलं. राज्य सरकार महिलांना अपंग करत असल्याचा आरोप या महिलांनी केलाय.



‘शासनाच्या योजनेअंतर्गत आम्ही वाटप केलेल्या साड्या, पिशव्या गावातल्या काही महिलांनी येऊन परत दिल्या. साड्या वाटप करून आमचा काही विकास होणार नाही, असं निवेदन महिलांनी आम्हाला दिलंय. महिलांनी दिलेलं निवेदन आम्ही शासनाला देणार आहोत'. - गोविंद बोडके, जिल्हाधिकारी

साड्यांऐवजी शिक्षक देण्याची मागणी :जव्हार येथील आदिवासी बहुल भागात रोजगार हमी योजनेशिवाय नागरिकांचा विकास होईल, अशा प्रकारची कोणतीही योजना गेल्या दहा वर्षात राबवली नाही. या भागाचा विकास व्हावा, म्हणून अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे. मात्र, केंद्रासह राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना लालूच देत असल्याची तक्रार तालुक्यातील महिलांनी केली आहे. महिलांनी सरकारी योजनेतूनमिळालेल्या साड्या जव्हार येथील तहसील कार्यालयात जमा केल्या. या वेळी शंकुतला भोईर म्हणाल्या, की वर्षभरात एखादी साडी देण्यापेक्षा आमची साडी आम्हीच घेऊ, असं काहीतरी राज्य, केंद्र सरकारनं करणं अपेक्षित आहे. साड्या वाटप करणं आवश्यक नसून त्या ऐवजी गावात शाळेला शिक्षक देण्याची गरज आहे. दहावी-बारावी शिकलेल्या मुलांना स्थानिक भागातच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. रोजगार हमी योजनेची कामे सुरू असून दहा मस्टर भरले, तरी चार-पाच महिन्यापासून मजुरीचे पैसे मिळाले नाहीत. साड्यांऐवजी महिलांचे कामाचे पैसे द्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

मोदींच्या पिशव्या वाटणे आचारसंहितेचा भंग :कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते अजय भोईर म्हणाले, की साड्या वाटप करणं, रिकाम्या पिशवीवर एखाद्या व्यक्तीचा फोटो छापून काय होणार आहे. साडी तसंच पिशव्या देऊन नागरिकांच्या समस्या सुटतील का, असा सवाल त्यांनी केला. मोदी यांच्या छायाचित्रासह देण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर बाजार करण्यासाठी केल्यास त्यातून लोकसभा निवडणुकीचा प्रचार होणार नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. हा आचारसंहितेचा भंग असून सरकारनं पिशव्यांच वाटप थांबवायला हवं असं भोईर म्हणाले. त्यावर पुरावठा अधिकाऱ्यांनी पिशव्यांचं वाटप थांबवल्याची माहिती दिलीय.

साड्या, पिशव्या ठेवून महिला परतल्या :जव्हार तालुक्यातील महिलांनी तहसील कार्यालयात जाऊन स्वस्त धान्य दुकानांतर्गत वाटप करण्यात आलेल्या शंभर साड्या परत केल्या. कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अंत्योदय योजना अंतर्गत ज्यांना धान्य मिळतं, अशा लाभार्थ्यांना धान्यासोबत प्रत्येकी एक साडी, बाजार करण्यासाठी एक पिशवी देण्यात आली. या पिशवीवर मोदींचं छायाचित्र आहे.

साड्या देणं अयोग्य :या वेळी महिलांच्या या भूमिकेला पाठिंबा देत आंदोलनासाठी पुढाकार घेणाऱ्या कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो म्हणाले, की स्वस्त धान्य दुकानातून अशा प्रकारे साड्या देणं अयोग्य आहे. शासनाच्या योजना नीट अमलात आणून विकास लोकांपर्यंत नेणे आवश्यक आहे. तसंच यासंदर्भात पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि विक्रमगड तालुक्यात आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती ब्रायन लोबो यांनी दिली.

हे वाचलंत का :

  1. शरद पवारांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या, शेतकरी आत्महत्येसाठी पवारांनी माफी मागावी - अमित शाह - Amit Shah On Sharad Pawar
  2. मुंबईतील ४ मतदारसंघाचा जागा वाटपाचा तिढा सुटणार तरी कधी? उमेदवारांची घोषणा बाकीच - Seats Allocation Issue Mumbai
  3. माझा विजय निश्चित, सर्व जाती धर्माने साथ द्यावी; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details