मुंबई Woman Murder Case: काल (24 जानेवारी) दुपारी जीटीबी नगर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या बाजूला असलेल्या तिकीट घराच्या पाठीमागील पडक्या खोलीच्या मागे एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडून आला होता. (murder out of rage for theft) या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसून येत होतं. त्यानुसार अँटॉप हिल पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोबाईल चोरल्यानं हत्या:मृत महिलेचे नाव अनुमीना उर्फ मोगली (वय 40 वर्षे) असं आहे. तिनं आरोपीचा मोबाईल चोरला होता. म्हणून आरोपी खानने मोगलीची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी आणि मृत महिला हे दोघेही नशेच्या आहारी गेलेले होते. आरोपी हा हमालीचं काम करतो.
6 तासात खुनाच्या घटनेची उकल:सुरुवातीला कलम १७७ सी.आर.पी.सी. अन्वये नोंद देण्यात आली होती. त्यानुसार पुढील चौकशी करून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयत महिलेची ओळख पटत नसल्यानं गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात येऊन पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवून ६ वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली. त्यानंतर फक्त सहा तासात ह्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आणि आरोपीला अटक करण्यात आली.
35 ठिकाणचे फूटेज तपासले:जी.टी. श्री. नगर रेल्वे स्थानक ते मानखुर्द रेल्वे स्टेशन वरील नमूद कालावधीतील वेगवेगळ्या ठिकाणचे ३५ सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. एन्टॉप हिल तसेच मानखुर्द परिसरातील ४० दुकानदारांकडे मृत महिलेचा घटनास्थळावरील उपलब्ध फोटो दाखवून शहानिशा केली. मृत महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्यानं तिची ओळख पटवण्यात अडचणी निर्माण झाल्या. महिलेच्या उजव्या हातावर गरुड पक्षाचा टॅटू असल्यानं अशा प्रकारचा टॅटू असलेल्या एकूण ३८ महिलांची शहानिशा करून अनोळखी मयत महिलेची ओळख पटविण्यात यश आलं.
6 तासाच्या आत अटक:त्यानंतर मयत महिलेला ओळखणाऱ्या इसमांची मुंबई तसेच मुंबई बाहेर तपास पथकांमार्फत चौकशी केली. तसेच स्थानिक रहिवाशी आणि गुप्त बातमीदारामार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले गेले. या गुन्ह्यातील आरोपी असगर अल्ती खान (वय २४ वर्षे) यास गुन्हा दाखल झाल्यापासून ६ तासांच्या आत ए.पी.एम.सी मार्केट वाशी येथून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली.
हेही वाचा:
- कांद्याचे दर घसरले; सोलापूर मार्केट यार्डात दोन हजार गाड्या भरून कांद्याची आवक
- ताडोबा क्षेत्रात वाघानं केलं स्वच्छता कर्मचाऱ्याला ठार; निमढेला प्रवेशद्वाराजवळील घटना
- नागपुरात तब्बल 'इतके' कुणबी प्रमाणपत्र वितरित, जिल्ह्यात कुणबी-मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र