महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांच्या सतर्कतेनं 7 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा उलगडा, नरबळीचा संशय; नेमकं प्रकरण काय? - NANDED CRIME

नांदेडमधील एका सात वर्षीय चिमुकलीला गावातीलच एका महिलेनं दोन दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

woman locked 7 years girl in house for two days in Nanded, suspicion of human sacrifice, Three accused arrested
चिमुकलीला घरात दोन दिवस ठेवलं डांबून (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2025, 12:02 PM IST

नांदेड : एका सात वर्षाच्या चिमुकलीला गावातील एका महिलेनं दोन दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दोन दिवसांनी या चिमुकलीचा तपास लागला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अघोरी विद्या किंवा नरबळीच्या उद्देशानं महिलेनं हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं? : 20 जानेवारी रोजी सात वर्षीय प्रांजल कदम दुपारी 4 वाजता शाळेतून घरी आली. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेच्या आसपास ती घराच्या बाहेर खेळायला गेली. मात्र, बराच वेळ होऊनही चिमुकली घरी परतलीच नाही. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी गावात तसंच नातेवाईकांकडं तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडलीच नाही. अखेर माळाकोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 10 जणांची टीम पाठवली. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डीवायएसपी अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माळाकोळी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यानंतर दोन दिवसांनी मुलगी गावातील एका महिलेच्या घरात कैदेत आढळली. पोलिसांनी मुलीची सुटका करत तीन जणांना अटक केली आहे.

नांदेडमध्ये 7 वर्षीय चिमुकलीला घरात दोन दिवस ठेवलं डांबून (ETV Bharat Reporter)

पुढील तपास सुरू :यासंदर्भात अधिक माहिती देतडीवायएसपी अश्विनी जगताप म्हणाल्या, "लोहा येथे माळाकोळी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सदर आरोपी महिला ही तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते. त्यामुळं नरबळीच्या उद्देशानं मुलीचं अपहरण केल्याची शक्यता आहे."

हेही वाचा -

  1. पोटच्या पोरीची आई-वडिलांनी केली हत्या, 'हे' धक्कादायक कारण आलं समोर
  2. शालेय साहित्य न मिळाल्यानं मुलाची आत्महत्या; तर वडिलांनी तिथंच संपवली जीवनयात्रा
  3. नांदेडात 17 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह! 12 तासाच्या आत मारेकऱ्यास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details