महाराष्ट्र

maharashtra

मित्राने टाकला मैत्रिणीच्या गळ्यात हात, तिसऱ्या मजल्यावरून पडून मैत्रिणीचा मृत्यू; थरार सीसीटीव्हीत कैद - Woman Death Case Thane

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 5:35 PM IST

Updated : Jul 17, 2024, 5:44 PM IST

Woman Died : मैत्रिणीसोबत गप्पा मारत असलेल्या मित्राने तिच्या गळ्यात हात घातला. त्यामुळे तिचा तोल जाऊन ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. दरम्यान मित्राने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु तिचा मृत्यू झाला. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण-शीळ मार्गावरील डोंबिवली पूर्वेतील विकास नाका परिसरात 16 जुलै रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

Woman Died
महिला तिसऱ्या मजल्यावरून पडताना (ETV Bharat Reporter)

ठाणेWoman Died : मित्र-मैत्रिण एकमेकांसोबत बोलत असताना मित्राने मैत्रिणीच्या गळ्यात हात टाकताच तिचा तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन ती खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची झाला. ही घटना कल्याण-शीळ मार्गावरील डोंबिवली पूर्वेतील विकास नाका परिसरात असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घडली आहे. सुदैवाने मैत्रिणीला वाचविण्याचा प्रयत्न करणारा मित्र मात्र कसाबसा इमारतीवरून पडता पडता बचावला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मित्रावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे, या मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

ठेंगण्या कठड्याजवळ उभं राहून बोलणं बेतलं जीवावर, तोल जाऊन महिलेचा मृत्यू (ETV Bharat Reporter)

जिन्याच्या छोट्या कठड्यामुळे झाला घात :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात मृतक महिला ही साफसफाईचे काम करते. ती डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ती तिच्या मित्रासोबत १६ जुलै रोजी (मंगळवार) दुपारच्या सुमारास बोलत उभी होती. जिन्याचा कठडा छोटा आहे. ती त्यावर बसली असताना तिच्यासोबत काम करणारा मित्र बंटी याने अचानक तिच्या गळ्यात हात टाकला. त्यामुळे दोघांचाही तोल जाऊन मैत्रिण तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. तर तोही पडता पडता बचावला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मित्राविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल :घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास करत बंटी नावाच्या मित्राविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय काबदने यांनी दिली आहे; परंतु या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

  1. हृदयदायक! आईसोबत प्रवास करणाऱ्या 17 वर्षीय मुलाचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू
  2. लोणावळा फिरणं बेतलं जीवावर; दरीत पडून इंजीनियर तरुणीचा मृत्यू
  3. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू, शाळा प्रशासनावर कारवाईची पालकाकडून मागणी
Last Updated : Jul 17, 2024, 5:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details