महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'टी-20 मॅच खेळलो, अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो', जयंत पाटलांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांची जोरदार बॅटिंग - DEVENDRA FADNAVIS

आमदार जयंत पाटील यांनी महायुती सरकारनं दिलेल्या आश्वासनांची जंत्रीच वाचली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीतल्या यशाचा पाढा वाचला. अनेक योजना राबवल्याचं सांगितलं.

पवार, फडणवीस, शिंदे
पवार, फडणवीस, शिंदे (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

मुंबई/नागपूर -हिवाळी अधिवेशनाचा शनिवारी सहावा आणि शेवटचा दिवस. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मागील सरकारने जाहीरनाम्याची जी-जी आश्वासनं दिली होती. त्याचा पाढा वाचत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, पण तो आठ महिन्यात पडला. पत्रकारांना 1500 रुपये पेन्शन योजना देण्याचं ठरवलं होतं. त्याचं पुढे काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्र तयार करण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं. त्याचं पुढे काय झालं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासनं दिलं होतं. त्याचं काय झालं, असे प्रश्न उपस्थित करत, सरकारला धारेवर धरलं. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करताना जोरदार बॅटिंग केली.

सगळे बॅट्समन मैदानावर उतरवले -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयंतराव तुम्ही आमच्या जाहीरनाम्यातील अनेक प्रश्न उपस्थित केले. पहिली अडीच वर्ष तुमचं सरकार होतं. आमचं सरकार नव्हतं. मग वेगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सरकार तयार केलं. आम्हाला माहिती होतं की, पुन्हा निवडून यायचं असेल ट्वेंटी-ट्वेंटीची मॅच खेळावी लागेल. म्हणून सगळे बॅट्समन मैदानावर उतरवले आणि अशी बॅटिंग केली की, आम्ही विश्वचषक जिंकलो. चॅम्पियन म्हणून सभागृहात आलो असा टोला देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना लगावला.


आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले - 2014 साली आमच्या सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा नदी जोडसारखे महत्त्वाचा प्रकल्प सरकारने पूर्ण केला. त्या प्रकल्पाच्या संदर्भात अनेक वर्ष केवळ चर्चा झाली होती. पण आम्ही ते पूर्ण केले. 2019 साली त्याचा पहिला जीआर काढला. त्यानंतर गेल्या अडीच वर्षामध्ये या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या. या प्रकल्पातील पाणी मध्य प्रदेश कधीच मागू शकत नाही. कारण त्यांना परवानगी मिळू शकत नाही. कारण तिथे जंगल आहे. मात्र वाहून जाणारं पाणी यातलं 62 टीएमसी पाणी आपण उचललो. हे 62 टीएमसी पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वळवलं. त्यामुळं 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. साधारणपणे दुष्काळीपट्ट्यांना या ठिकाणी नदीजोड प्रकल्प राबविण्यात आला. दरम्यान, साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदीजोड प्रकल्प आपण तयार करणार आहोत. सगळ्यात नदीजोड प्रकल्पाचं पाणी महत्त्वाचं आहे. ते भविष्यातलं जे औद्योगिकीकरण होणार आहे त्याच्याकरता वापरण्यात येणार आहे. परिणामी विदर्भामध्ये मुबलक पाणी उपलब्ध उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारनं अनेक प्रकल्प हातात घेतले आहेत. बळीराजा योजनेतून 110 प्रकल्प हाती घेतले. उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी वेगवेगळ्या योजनातून आणतोय. तसंच शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध प्रकल्प सुरू करुन दिला. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. 'कृषी सिंचन योजनेअंतर्गत 7 प्रकल्प पूर्ण करतोय' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा...

  1. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
  2. मराठी लोकांना मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचं तात्काळ निलंबन- देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details