महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात पाणी संकट : पावसाअभावी अनेक प्रकल्प गेले मृतसाठ्याच्यापातळीवर - Water crisis in Beed

Water crisis in Beed : बीड जिल्ह्यात पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मृतसाठ्याच्या पातळीवर गेले आहेत. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

Water crisis in Beed
बीडमधील प्रकल्प मृतसाठ्यात (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 6:53 PM IST

बीड Water crisis in Beed :जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने 143 प्रकल्पांमध्ये शेती तसच पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात 16 मध्यम प्रकल्प तसच 126 लघु प्रकल्प आहेत. त्यापैकी केवळ 3 प्रकल्प भरले असून त्यात महासांगवी मध्यम प्रकल्प पाटोदा, कडा मध्यम प्रकल्प आष्टी, वान मध्यम प्रकल्प, नागापूर परळी तसच 12 लघु प्रकल्प भरले नसल्यानं बीडमधील शेतकऱ्यांसमोर पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, परळी शहराला पाणीपुरवठा करणारा नागापूर तालुक्यातील वान मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. त्यामुळं पाण्याचं संकट दूर झाल्यानं परळीकरांनी समाधान व्यक्त केलय.

बीडमधील प्रकल्प मृतसाठ्यात (ETV BHARAT Reporter)

धरणाची पाणीपातळी कमी :1966 मध्ये पूर्ण बांधकाम झालेल्या वान धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 19.72 द.ल.घ.मी. आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये परळी तालुक्यातील नागपूर, माळीवरा, मांडेखेल, तळेगाव, तडोली, भिलेगाव, परचुंडी, लिंबुटा या गावांचा समावेश आहे. परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूरच्या वान धरणात गेल्या दहा दिवसांपासून पावसाच्या पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे आज सकाळी धरण भरलं. उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी कमी झाल्यानं परळीनगर परिषदेकडून शहराला दर चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. शहरातील सुधारित पाणीपुरवठ्यासाठी पालिकेला लवकरच नियोजन करावं लागणार आहे. तसंच धरण भरल्यानं नगर परिषदेनं परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.



मराठवाडा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत : मराठवाड्यातील 750 लघु तसंच 75 मध्यम प्रकल्पांपैकी 93 लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. याशिवाय 417 लघु-मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा खाली गेला आहे. यंदा पाऊस चांगला पडेल, असा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. त्यामुळं चांगला सुरू झालेला पाऊस मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांसह धरणांची तहान झटपट भागवेल, असं वाटत होतं. मात्र जुलै महिना संपल्यानंतही मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थिती सुधारताना दिसत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details