पुणे (चिखली)Talgaon Chikhli History : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज (28 जून) प्रस्थान होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूत दाखल झाले आहेत. तुकाराम महाराज कीर्तन करताना उत्तमरीत्या टाळ वाजवायचे. देहू पंचक्रोषीतील 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी पिंपरी-चिंचवड जवळील चिखली गावातील होते. वैकुंठगमनाआधी तुकाराम महाराजांनी आपले टाळ या गावात टाकले होते. तेच हे दगडाचे टाळ असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
असे पडले टाळगाव चिखली नाव :भाविक मोठ्या श्रध्देने देहू-आळंदी बरोबरच टाळगाव चिखलीत जाऊन दगडाच्या टाळचं दर्शन घेतात. हे दगडाचे टाळ इथे कसे आले? या मंदिराचा काय इतिहास आहे? त्याबद्दल इथल्या ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थस्थान देहू-आळंदी. त्यांच्या मधोमध चिखली गाव वसले आहे. संत तुकाराम महाराज यांनी वैकुंठाला जाताना आपले टाळ चिखली गावात टाकले होते. त्यावरूनच गावाला ‘टाळगाव चिखली’ असे संबोधले जात आहे. त्या घटनेचे साक्षीदार असलेले टाळ मंदिर आजही गावात आहे. तसंच महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी निष्ठावंत टाळकरी मल्हारपंत कुलकर्णी त्यापैकी एक होते.