महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केज न्यायालयातील वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे, काय कारण? - WALMIK KARAD

वाल्मिक कराडने (walmik Karad) खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज अचानक मागे घेतला आहे. आज या अर्जावर सुनावणी होणार होती.

Walmik Karad And kej court
वाल्मिक कराड आणि केज न्यायालय (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2025, 1:12 PM IST

बीड :बीडसह राज्यात गाजत असलेलं संतोष देशमुख खून प्रकरणातील खंडणी गुन्ह्यातील आरोपी म्हणून वाल्मिक कराडवर (walmik Karad) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कालच मकोका अंतर्गत असलेल्या कारवाई संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयात याच्यावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपीचे वकील अशोक कवडे यांच्यात युक्तिवाद झाला. वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्याचबरोबर आज खंडणी गुन्ह्याची केज न्यायालयात सुनावणी होती. मात्र आरोपीचे वकील अशोक कवडे यांनी वाल्मिक कराडच्या जामीनासाठी जो अर्ज केला होता तो मागे घेण्यात आला आहे.

पुढील सुनावणी केव्हा? :केज न्यायालयात जर जामीन अर्ज फेटाळला तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत देखील जामीनासाठी अर्ज करावा लागेल अशी माहिती मिळत आहे. त्यामुळं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेण्यात आला. मात्र याच्या पुढील सुनावणीची तारीख अजून समजली नाही.

प्रतिक्रिया देताना सरकारी वकील जितेंद्र शिंदे (ETV Bharat Reporter)

बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कराडवर उपचार सुरू : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. मात्र बुधवारी मध्यरात्री वाल्मिक कराडच्या पोटात दुखू लागल्यानं त्याला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री एक वाजता दाखल करण्यात आलं. यावेळी त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्यानं त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी बीड जिल्हा सत्र न्यायालयात मकोका अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सींगनं सुनावणी घेण्यात आली. यामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

वाल्मिक कराडनं दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप :अवादा कंपनीच्या मॅनेजरला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आला. या संदर्भात ही सुनावणी घेण्यात आली. न्यायालयानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या 14 दिवसांच्या कोठडीनंतर काय कारवाई होते, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड सत्र न्यायालयात सुनावणी
  2. आरोपी वाल्मिक कराडला मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात केलं दाखल; काय आहे नेमकं प्रकरण ?
  3. संतोष देशमुख खून प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, वाल्मिक कराडच्या सुनावणीवर वकील म्हणाले . . .

ABOUT THE AUTHOR

...view details