बुलढाण्यात मतदानाला सुरुवात; अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी केलं मतदान बुलढाणा Lok Sabha Election 2024 :देशभरात लोकशाहीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदानासाठी मतदार बाहेर पडण्यास सुरुवात झाली. बुलढाण्यातील सावळा या गावांमधील मतदान केंद्रावर जाऊन पहिल्या मतदारानं आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच "मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि देशाला सुरक्षित ठेवेल, अशा उमेदवाराला मतदान करावं," असं आवाहन या मतदारानं केलं. बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनीही आपल्या मूळगावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी केलं मतदान जिल्ह्यातील 1962 मतदान केंद्रावर मतदान सुरू :लोकसभा मतदार संघासाठी आज 26 एप्रिलला सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान सुरू आहे. जिल्ह्यातील 1962 मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झाले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघात शिवसेना, उबाठा, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष आदी पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
लोकसभा मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज :बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजतापासून सुरूवात झाली आहे. या मतदान संघात 17 लाख 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच 5 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर उमेदवार रविकांत तुपकर यांनी मूळ गावी जाऊन केलं मतदान :बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी नेते तथा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी आज सकाळीच आपल्या सावळा या मूळगावी जाऊन सपत्नीक मतदान केलं. बुलढाणा लोकसभेसाठी महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष असे एकूण 21 उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत. मात्र बुलढाणा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते तथा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात तिहेरी लढत होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. रविकांत तुपकर हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. रविकांत तुपकर आणि त्यांची पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी आपल्या सावळा या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. "लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते. आयुष्यामधील पहिली निवडणूक मी लढत आहे. जनतेचा मला भरभरून पाठिंबा मिळत आहे. जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हाचं बटन दाबताना मला आनंद मिळाला, खूप चांगलं वातावरण आहे. चटणी भाकरी खाऊन जनतेनं माझा प्रचार केला. जनतेचे उपकार मी कधीही विसरणार नाही. जनतेनंच ही निवडणूक हाती घेतली आहे. जनतेचा विजय होणार आहे. माझ्या चामड्याचे जोडे जरी करून घातले, तरी मी त्यांचे उपकार फेडू शकणार नाही. तरुण-तरुणी, वृद्ध महिलांनी मतदानासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा," असं आवाहन अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर केलं आहे.
हेही वाचा :
- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज मतदान, कोणते उमेदवार आहेत रिंगणात? - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान सुरू; राहुल गांधी, ओम बिर्ला, पप्पु यादव यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला - Lok Sabha Election Phase 2