मुंबई Vistara Dubai Flight: दुबईहून आलेल्या विस्तारा फ्लाइटच्या काही प्रवाशांना रविवारी इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता उतरल्यानंतर मुंबई विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनलवर नेण्यात आले. (Bureau of Civil Aviation Security) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ऑपरेटिंग प्रक्रिया कडक करण्यात येणार असल्याचं विस्तारा एअरलाइननं सांगितलं. भारतीय विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अनिवार्यपणे इमिग्रेशन प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. काल घडलेली ही घटना उघडपणे सुरक्षेचं उल्लंघन आहे.
'ही' घटना चुकीनेच घडली: विस्ताराच्या प्रवक्त्यानं एका निवेदनात म्हटलं की, काही प्रवाशांना आंतरराष्ट्रीय आगमनाऐवजी देशांतर्गत आगमनासाठी "चुकीने" नेण्यात आले. या प्रवाशांना नंतर आंतरराष्ट्रीय औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नियुक्त टर्मिनलवर नेण्यात आले. प्रवक्त्यानx सांगितले की, "4 फेब्रुवारी रोजी विस्तारा फ्लाइट UK 202 ने दुबईहून मुंबईला आलेल्या आमच्या काही प्रवाशांना चुकून आंतरराष्ट्रीय आगमनाऐवजी देशांतर्गत आगमनाकडे नेण्यात आले."
आगमनाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया: या अक्षम्य चुकीबद्दल ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) कडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एअरलाइननx पुढे सांगितले की, या प्रवाशांना त्यांच्या आगमनाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाची समाप्ती करण्यासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी नेले जाईल. याची खात्री करण्यासाठी त्यांच्या कार्यसंघांनी सुरक्षा एजन्सीसह संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम केले.
विस्तारा एअरलाइन्सचा हा मोठा घोटाळा : विस्तारा एअरलाईन्सचे प्रवक्ता म्हणाले की, "कोणत्याही प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आम्ही आमच्या मानक कार्यपद्धतींचा आढावा घेत आहोत आणि सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करीत आहोत." विस्तारा पुढे म्हणाले तत्पूर्वी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "विस्तारा एअरलाइन्सचा हा मोठा घोटाळा आणि सुरक्षेचा भंग आहे." "दुबई UK202 मधून आता आलेले सर्व पॅक्स सर्व इमिग्रेशन/कस्टम्स आणि थेट लगेज बेल्टला बायपास करून बसने डोमेस्टिक टर्मिनल गेटवर सोडले गेले आहेत." या पोस्टवरून वापरकर्त्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा:
- अदानींची लाचारी सोडून मुंबईला वाचवा- खासदार अरविंद सावंत यांची मंत्रिमंडळाच्या 'त्या' निर्णयावरून टीका
- आमदार गणपत गायकवाडांचे मुख्यमंत्र्यांवरील 'ते' आरोप बिनबुडाचे - मंत्री शंभूराज देसाई
- कोणीही आयुष्याचा आणि सत्तेचा अमरपट्टा घेवून आलेला नाही-उद्धव ठाकरे