पुणेPune Hit And Run Case: पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात अनेक गंभीर प्रकरणे बाहेर येऊ लागलीत. बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे (Dr Vinayak Kale) यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलय. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडं अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलाय. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार (Etv Bharat Reporter) सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होत का? : विजय वडेट्टीवार म्हणाले की, सडलेले आंबे बाहेर फेकायला पाहिजे, पण आत्ता आंब्याच टोपलच बाहेर फेकायचं काम केलं जातं आहे. काळे हे मॅटमध्ये जाऊन ते बदली विरोधात लढले. आत्ता ही ऐतीची संधी मिळाली आहे की, पैसे घेऊन मर्जीतीला माणूस बसवाला आणि त्याचा फायदा ते घेत आहेत. ससूनच्या डीनला आत्ताच्या परिस्थिती सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होत का? तर ते नव्हतं कारण त्या प्रकरणात ते थेट जबाबदार दिसत नसल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय.
अधिकाऱ्याला फासावर चढवलं पाहिजे : शासनाकडून डॉ. अजय तावरे यांचं निलंबन करण्यात आलंय. याबाबत वडेट्टीवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, निलंबन नव्हे तर अशा ना... अधिकाऱ्याला फासावर चढवलं पाहिजे. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, पुणेकर नागरिकांनी जी मागणी केली आहे ती रास्त असून ज्या पद्धतीने त्यांनी हे प्रकरण हाताळलं आहे त्यात त्यांचं खूप मोठं दुर्लक्ष दिसत आहे. ते जिथे जिथे गेले आहे तिथे तिथे वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळं त्यांच्या बदलीची मागणी जर पुणेकर करत असतील तर ती योग्य आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे. तसेच जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्यांना वाचवणाऱ्याना पण शिक्षा झाली पाहिजे. यात आरोपी हे श्रीमंत आहे तेव्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. - विजय वडेट्टीवार,विरोधी पक्ष नेते
पोलिसांना कुणाचं फोन होता ?: तसेच चौकशी समितीबाबत वडेट्टीवार म्हणाले की, पल्लवी सापळे भ्रष्टाचार सापळ्यात आहे. त्या साफ सफाई करायला पाठवले आहे. डॉ.तावरेंवर देखील गंभीर आरोप आहेत. तावरे यांच्या बदलीचा प्रस्ताव होता. एका मोठ्या गुन्ह्यातील आरोपीला संरक्षण तावरे यांनी दिलं होतं. म्हणून त्यांची बदली झाली नाही. मी न्यायिक चौकशी मागणी केली आहे. तसेच कल्याणीनगर येथील घटना घडेपर्यंत कारवाई होत नाही. पोलिसांना कुणाचं फोन होता, कोणी फोन केला, त्याला देखील सहआरोपी केलं पाहिजे.
पुणे हिट अँड रन घटनेमागे राजकीय दबाव होता. त्याचे पुरावे आहेत. घटना घडते आणि पोलिस सुस्त होतात. गुन्ह्याची नोंद नीट होत नाही, रक्ताचे नमुने बदलले जातात, सगळं प्रकरण संशय निर्माण करणारे आहे. तसेच यामागे राजकीय पाठबळ असल्याचं समोर येतय. यात कोणत्याही परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते
मनुस्मृतीचा विषय डायव्हर्ट केला जात आहे :जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे चळवळीमधील आहे. ते बाबासाहेबांना मानणारे आहे. अनावधानानं त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला असेल. तसेच त्याबाबत त्यांनी माफी देखील मागितली आहे. मनुस्मृतीचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी भाजपाकडून केविलवाना प्रयत्न केला जात आहे.
सरकारमध्ये सगळ्यांनी लुटण्याचं काम केलंय :राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत सांगितलं जात आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, सरकार बदलण्याची वेळ आली. एकाला बदलून उपयोग काय? या सरकारमध्ये सगळ्यांनी लुटण्याचं काम केलं. एक चोराला बाजूला केल्यानं काय होणार आहे. त्यामुळं आत्ता लोकांनी ठरवलं आहे.
हेही वाचा -
- पुणे हिट अँड रन प्रकरण: "आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?'...; अजित दादांनी 'त्या' आमदाराला झापलं... - Pune Hit And Run Case
- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आजोबाला कोठडी, जाणून घ्या काय आहे अपघाताची ए टू झेड कहाणी - Pune Porsche Accident Case
- पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी - Pune Hit And Run Case