महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

17 कोटी 94 लाख 75 हजारांचा गंडा : आरोपीला पोलिसांनी तिरुपतीत बेड्या ठोकल्या, एक वर्षापासून होता फरार - Fraud of investors in Mumbai - FRAUD OF INVESTORS IN MUMBAI

Fraud of investors in Mumbai : एका वर्षापूर्वी 147 गुंतवणूकदारांची 17 कोटी 94 लाख 75 हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तिरुपतीत बेड्या ठोकल्या आहेत. व्यंकटरमणन गौपालन असं आरोपीच नाव असून त्यांना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Etv Bharat File Photo
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 8:05 PM IST

मुंबईFraud of investors in Mumbai :मुंबईतील 147 गुंतवणूकदारांना एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स कंपनीच्या उद्योगात मुदत ठेवीची रक्कम 7 ते 10 टक्के व्याजासह परत करण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्याचं प्रकरण समोल आलं होतं. या प्रकरणात एकूण 17 कोटी 94 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली झाली होती. आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षी गुन्हा याप्रकरणी दाखल केला होता. तेव्हापासून फरार असलेला आरोपी व्यंकटरमणन गौपालन याला तिरुपती येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संग्राम सिंह निशानदार यांनी दिली आहे.

7 ते 10 टक्के व्याजचं अमिष :एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स या कंपनीचे प्रोप्रायटर गौपालन (56) चेन्नईमध्ये राहतात. त्यांनी त्यांचा आद्योग कृषी आयात उत्पादन उद्योग असल्याचं भासवून गुंतवणूकदारांना 7 ते 10 टक्के व्याजचं अमिष दाखवलं होतं. यासाठी गौपालन यांनी विविध वृत्तपत्रांतून जाहिरात देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केलं होतं.

आरोपीला तिरुपती येथून अटक : डिसेंबर 2021 ते मार्च 2023 या कालावधीत आरोपी गौपालन यांनी जी. व्ही.आर. एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स कंपनीचं मुंबईती सांताक्रूझ कार्यालय उघडलं होतं. त्यावेळी त्यांनी गुंतवणूकदारांना विविध मुदत ठेवींवर 7 ते 10 टक्के मासिक व्याज परत करण्याचं आमिष दाखवलं. त्यातून त्यांनी एकूण 17 कोटी 94 लाख 75 हजार रुपयाची फसवणूक केली. त्यानंतर आरोपींनं मुंबईतून पोबारा केला होता. फिर्यादीनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी व्यंकटरमणन गौपालन यांच्याविरुद्ध 7 जुलै रोजी भारतीय दंड विधानाच्या कलम 409, 420 सह एमपीआयडी कायद्याच्या कलम 3, 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा केल्यानंतर गेल्या वर्षभरापासून आरोपी फरार होता. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपीला 3 जुलै रोजी तिरुपती येथून अटक केली.

आरोपीला 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी : आर्थिक गुन्हे कक्ष-14 विभागातील तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, पोलीस हवालदार नलावडे, पोलीस हवालदार आव्हाड यांच्या पथकानं तिरूपती, आंध्र प्रदेश येथे 2 ते 3 दिवस सापळा रचून अत्यंत शिताफिने गुन्ह्यातील आरोपी वेंकटरमनन गोपालन याला अटक केली. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून तपासी अधिकारी सखोल तपास करत आहेत. गुंतवणुकदारांची गुंतवणुकीची रक्कम हस्तगत करण्याच्या दृष्टीनं तपास चालू आहे.

'हे' वाचलंत का :

  1. बंटी बबलीचा प्रताप; घर मालकाला डावलून भाडेकरुंना घरं देऊन लावला लाखोचा चुना - Thane Crime News
  2. नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची भीती दाखवून व्यावसायिकाला 2.18 कोटींचा गंडा - Mumbai Cyber Fraud
  3. पावभाजी विक्रेत्याला घातला सायबर गंडा, कर्जासाठी अ‍ॅपवर घेतली वैयक्तिक माहिती, नवीन कायद्यानुसार मुंबईत पहिला गुन्हा दाखल - Cyber Criminal Cheated Businessman

ABOUT THE AUTHOR

...view details