बारामती (पुणे)Vanchit Support Supriya Sule: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होऊ शकला नाही. मात्र, असं असलं तरी बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शविला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
म्हणून मानले आंबेडकरांचे धन्यवाद :खासदार सुप्रिया सुळे आज (3 एप्रिल) बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील निरावागज येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आणि त्यांच्या संघटनेने एका विश्वासाच्या नात्याने मला जी साथ आणि आशीर्वाद दिलेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनःपूर्वक आभार मानते.
यासाठी ही लढाई :बारामतीत जरी वंचितने पाठिंबा दिला असला तरी इतर ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. याचा फटका बसेल का? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजूनही चर्चा चालू आहे. आमची अपेक्षा आहे की संविधान वाचविण्यासाठी तसंच देशातील दडपशाही हद्दपार करण्यासाठीची ही लढाई आहे. यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
याविरोधात मविआची लढाई सुरू :ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी अनेकांकडून मागणी होत आहे. या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सुप्रीम कोर्ट हे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा गैरवापर तसंच निवडणूक प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. ही आपल्या सगळ्यांसाठीच प्रचंड वेदना देणारी आणि चिंताजनक गोष्ट या देशात झाली आहे. जगात सर्वात मोठी लोकशाही भारत देशात आहे. मात्र, या देशात दडपशाहीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत का? अशी काळजी वाटते. या विरोधातच आमची लढाई आहे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
Vanchit Support Supriya Sule : वंचितचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा; सुळेंनी मानले आभार - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS
Vanchit Support Supriya Sule : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बारामतील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना समर्थन दर्शविलं आहे. याबद्दल सुळे यांनी आंबेडकरांचे आभार मानले. संविधान वाचविण्यासाठी तसंच देशातील दडपशाही हद्दपार करण्यासाठी ही लढाई लढत असल्याचं त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंना पाठिंबा
Published : Apr 3, 2024, 3:58 PM IST
हेही वाचा :
- काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात सीपीआयच्या ॲनी राजा मैदानात; वायनाडमध्ये 'इंडिया' आघाडीतच जोरदार टक्कर - Lok Sabha Election 2024
- उबाठा गटाकडून लोकसभेच्या चार जागा जाहीर; उन्मेश पाटलांनी हाती बांधलं 'शिवबंधन' - Lok Sabha Election 2024
- उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, भाजपावर टीका करताना म्हणाले,... - Unmesh Patil news