महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'उपराकार' लक्ष्मण मानेंनी केली उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं कारण काय? - Laxman Mane On Udayanraje - LAXMAN MANE ON UDAYANRAJE

Laxman Mane On Udayanraje : संसदेच्या परिसरातील महापुरुषांचे पुतळे हटवल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांनी केंद्र सरकारला जाब विचारावा. हे शक्य होणार नसेल तर दोघांनी भाजपाचा राजीनामा, अशी मागणी 'उपराकार' लक्ष्मण मानेंनी (Uparakar Laxman Mane) केलीय.

Laxman Mane On Udayanraje And Shivendraraje
उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 10:50 PM IST

सातारा Laxman Mane On Udayanraje: छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचे लोकसभेच्या परिसरातील पुतळे भाजपा सरकारने अडगळीत टाकले आहेत. सातारच्या दोन्ही राजेंनी देशव्यापी आंदोलन उभे करून केंद्र सरकारला जाब विचारावा. अन्यथा उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी (ShivendraRaje Bhosale) भाजपाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी 'उपराकार' लक्ष्मण मानेंनी (Uparakar Laxman Mane) केलीय.



अन्यथा वारसा सांगण्याचा अधिकार राहणार नाही : पद्मश्री तथा उपराकार लक्ष्मण माने यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना महापुरुषांचे पुतळे हटवण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीचा कडक शब्दांत निषेध केला. यावेळी 'उपराकार' मानेंनी साताऱ्याच्या दोन्ही राजेंनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. तसेच पुतळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी देशव्यापी आंदोलन छेडून त्याचे नेतृत्व दोघांनी करावं. अन्यथा राजघराण्याचा वारसा सांगण्याचा अधिकार दोघांना राहणार नाही, असंही माने यांनी म्हटलंय.



भाजपाकडून थोर पुरुषांचा अवमान : देशातील गुलामगिरीला ज्यांनी चुड लावली. समताधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पाहिले, अशा थोर पुरुषांचे पुतळे हे केवळ पुतळे नाहीत तर तमाम देशवासियांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे पुतळे हटवून भाजपानं त्यांचा अवमान केला आहे, असा संताप व्यक्त करून पद्मश्री लक्ष्मण माने यांनी तीव्र शब्दांत केंद्र सरकारचा निषेध केला.



अधिवेशनाच्या दिवशीच लाक्षणिक उपोषण : संसदेचं अधिवेशन दि. २२ जुलैला सुरु होत आहे. तोपर्यंत छत्रपतींचे वारसदार म्हणून उदयनराज आणि शिवेंद्रराजेंनी ठोस भूमिका घ्यावी. अन्यथा आपण अधिवेशनाच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पद्मश्री लक्ष्मण मानेंनी स्पष्ट केलं. उपोषणात शिव, शाहू, फुले, आंबेडकरवादी, गांधीवादी नागरिकांनी सहभागी होवून निषेध नोंदवावा, असं आवाहनही त्यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. साताऱ्यात उदयनराजेंच्या मिरवणुकीत चोरट्यांनी लांबवले 20 तोळ्याचे दागिने - Theft in Udayanraje Bhosale procession
  2. लोकसभा निवडणुकीतील विजयावर उदयनराजे असमाधानी; म्हणाले, 'अशी चिटुरकी पोचपावती...' - Satara Lok sabha Election Result 2024
  3. देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ शंभूराज देसाई म्हणाले; "मला मंत्रिपदापासून मुक्त करा", कारण काय? - Shambhuraj Desai News

ABOUT THE AUTHOR

...view details