महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...", बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया - Minor Girls Sexual Assault Case - MINOR GIRLS SEXUAL ASSAULT CASE

Uddhav Thackeray On Badlapur Case : मुंबईतील बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आलीय. यानंतर बदलापूर येथील संबंधित शाळेची तोडफोड करण्यात आली असून संतापलेल्या जमावानं रेल्वे स्टेशन येथे दगडफेक केली आहे. तर याप्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

Uddhav Thackeray angry reaction on Badlapur Minor Girls Sexual Assault Case
उद्धव ठाकरे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 5:28 PM IST

मुंबई Uddhav Thackeray On Badlapur Case : बदलापूर येथील एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ उडालीय. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासून नागरिक जोरदार आंदोलन करतायेत. या घटनेतील आरोपीला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. तसंच 'लाडकी बहीण योजना नको, पण महिला सुरक्षिततेची योजना द्या', अशी मागणीही आंदोलक यावेळी करताय. या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. तसंच पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गुन्हेगाराला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)


काय म्हणाले उद्धव ठाकरे : याप्रकरणी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, "अशा प्रकारच्या घटना देशात वारंवार घडतायत. ठराविक राज्यातील ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. एका बाजूला लाडकी बहीण योजना आणत असताना छोटी बहीण मात्र असुरक्षित आहे. देशात आणि राज्यात अशा प्रकारच्या घटना कुठही घडू नयेत. गुन्हेगारांवर विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी गुन्हेगारांवर फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून त्यांना शिक्षा द्यावी."

भाजपा कार्यकर्ते असतील तर निबंध लिहून घेणार का : पुढं ते म्हणाले, "आम्हा शक्ती विधेयक आणण्याची तयारी केली होती. मात्र, आमचं सरकार गद्दारांनी पाडलं. शक्ती विधेयकाचा धाक निर्माण करण्याची जबाबदारी आता या सरकारची आहे. बदलापूरमधील शाळा भाजपाच्या लोकांशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. मला राजकारण करायचं नाही. मात्र, गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाईला विलंब व्हायला नको. वरळीतील घटनेचं पुढं काय झालं? तसंच बदलापूर प्रकरणात भाजपा कार्यकर्त्यांचा समावेश असला तर त्यांच्याकडून निबंध लिहून घेणार का?", असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा -

  1. बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिले 'एसआयटी' चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री म्हणाले, "दोषींना सोडणार नाही" - SIT Probe In Badlapur Rape Case
  2. बदलापूर अत्याचार घटनेची सरकारकडून गंभीर दखल; शाळा मुख्याध्यापिका निलंबित, कठोर कारवाईचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश - Badlapur Girls Sexually Assaulted
  3. चिमुकलीवर शाळेत अत्याचार; बदलापूरमध्ये संतप्त जमावानं रेल्वेसेवा रोखली, आरोपीला फाशीची मागणी - Badlapur Girls Sexually Assaulted

ABOUT THE AUTHOR

...view details