महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत आजही संशयाला वाव"; मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया - Uday Samant

Uday Samant : शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यावर आधारित 'धर्मवीर'चा दुसरा भाग रिलीज झाला. तर दुसरीकडं आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Uday Samant
मंत्री उदय सामंत (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 10:51 PM IST

पुणे Uday Samant :नुकताच 'धर्मवीर टू' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला उत्तम असा प्रतिसाद मिळत असताना पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत जोरदार चर्चा सुरू झालीय. याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"मला आनंद दिघे यांच्याबरोबर काम करायचं भाग्य काही लाभलं नाही. मी जे काही वाचलं, ऐकलं आहे त्यात ते चांगल्या पद्धतीने सहकाऱ्यांशी बोलत होते आणि दोन तासात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं आहे. आता यात संशयाला वाव आहे. तसेच चित्रपटात जे दाखवण्यात आलं त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत सांगावं". -दय सामंत, उद्योग मंत्री

प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत (ETV Bharat Reporter)


महाराष्ट्राची उद्योग भरारी :उदय सामंत म्हणाले की, आज पुण्यामध्ये दोन महत्वाच कार्यक्रम पार पडले. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 11 हजार कोटी भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. आताचा कार्यक्रम हा 11 हजार दोनशे चाळीस कोटींचा प्रोजेक्टचा आहे. एकूण सात ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. लोकसभेला जे खोटं नरेटिव्ह सेट करण्यात आलं याचं प्रिकोशन म्हणून नाही तर, आम्ही जे राज्याच्या विकासासाठी चांगल काम केलं त्यासाठी 'महाराष्ट्राची उद्योग भरारी' हा कार्यक्रम आम्ही विविध शहरात घेत आहोत.


माझ्या मोबाईलवर चर्चा करू नये : मेट्रोचे उद्घाटनाच्या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवल्याची चर्चा झाली आणि यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत टीका केली होती. यावर उदय सामंत म्हणाले की, "ज्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. त्यांनी माझ्या मोबाईलवर चर्चा करू नये. माझा फोन खुर्चीवर राहिला होता. आमचे काही उत्साही कार्यकर्ते यांनी अनाउन्समेंट केली आणि नंतर मोबाईल मिळाला". माझ्या शेजारी अजित पवार बसले होते त्यांनी तो घाईगडबडीत घेऊन गेला होता आणि परत आणून दिला.

हेही वाचा -

  1. वैमानिकानं विमान उडवण्यास दिला नकार; उदय सामंतांना कारनं गाठावं लागलं छत्रपती संभाजीनगर - Uday Samant Belora Airport
  2. "थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल..." - उद्योगमंत्री उदय सामंत - Maharashtra Udyog Bharari
  3. सूरजागडमध्ये स्टील प्रकल्पात स्थानिकांना रोजगार, गडचिरोलीत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक - उदय सामंत - Surjagad Steel Project

ABOUT THE AUTHOR

...view details