महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घराची भिंत कोसळल्यामुळं दोन कामगारांचा मृत्यू, दोन जखमी - Wall Collapsed In nashik - WALL COLLAPSED IN NASHIK

Wall Collapsed In nashik : नाशिक शहरातील डीके नगर भागात दुपारी मोठी दुर्घटना घडलीय. येथे भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू (Two Workers Died) झालाय, तर अन्य दोघे व्यक्ती गंभीर जखमी झालेत.

Two labourers died
भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 10:15 PM IST

नाशिक Wall Collapsed In nashik: शहरातील गंगापूर रस्त्यावरील डीके नगर भागात बंगल्याचं बांधकाम सुरु असताना, भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू (Two Workers Died) झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच ही भिंत बांधण्यात आली होती. या ठिकाणी भाजपाचे लोकसभा संघटक केदा आहेर (Keda Aher) यांच्या बंगल्याचं काम सुरू आहे.


अशी घडली घटना: पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, नाशिकच्या गंगापूर रोड भागातील डीके नगर या भागात भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा संघटक केदा आहेर यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी तळमजल्याच्या उभारणीसाठी खोल खड्डा खोदण्यात आलाय. या खड्ड्यात भिंतीचं बांधकाम करण्यात येत होते. सहा बांधकाम मजूर खड्ड्यात उतरून भिंत बांधत असताना एका बाजूची भिंत अचानकपणे खड्ड्यात कोसळली. यामुळं चार मजूर त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींवर उपचार सुरू : गोकुळ संपत पोटिंदे आणि प्रभाकर काळू बोरसे असं या मजुरांचं नाव आहे. तर संतोष तुकाराम दरोगे आणि अनिल रामदास जाधव आणि असं जखमींचे नावे आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू : याआधीही अशीच एक घटना घडली होती. नालासोपारा पूर्वेकडील वाकण पाडा इथल्या चौधरी कंपाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामाची टोलेजंग भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला होता, तर ४ जण जखमी झाले होते.

हेही वाचा -

  1. अनधिकृत बांधकामाची पडली भिंत; एका मजुराचा मृत्यू, पाच जण जखमी
  2. भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू; गोरेगाव फिल्म सिटीमधील घटना
  3. Mathura House Wall Collapse: मंदिराजवळील इमारतीची भिंत कोसळल्याने 5 भाविकांचा मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details