नागपूर - भरधाव ट्रकनं मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन तरुण ठार जागीचं ठार झाले आहेत. एक तरुण गंभीर झालाय. अपघात हिंगणा-गुमगाव मार्गावर घडलाय. आर्यन हुकूमचंद पालिवाल (२३) आणि सुमेध उर्फ सुमित राहुल सिरसाट (१७) अशी मृतकांची नावं असून अरमान रवींद्र मडामे (१७) नामक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तीन मित्र जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलनं हिंगण्याच्या दिशेनं येत असताना विरुद्ध बाजूने येत असलेल्या ट्रकनं मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटरसायकल चालकासह त्याचा एक मित्र जागीच ठार झाला. तर मागे बसलेला युवक सुद्धा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुंमगाव मार्गावर घडला.
धाब्यावर जाणे जीवावर बेतले -तिघे मित्र हे मोटरसायकलने धाब्यावरून जेवण आणायला गुमगावकडे गेले होते. तेथून परत घराकडे येत होते. तर समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली या अपघातात चालक आर्यन आणि मागे बसलेल्या सुमेधचा जागीच मृत्यू झाला आहे.